‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम बबिता म्हणजेच लोरप्रिय अभिनेत्री मुनमुन दत्ता ही नेहमीच चर्चेत असतात. त्याचप्रमाणे ती सोशल मिडीयावर देखील चांगलीच सक्रिय असते. ती इंस्टाग्रामवर काही ना काही पोस्ट करतच असते. नुकतच मुनमुनने नविन घर घेतलं असून तिने तिच्या या नविन घराचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

मुनमुनची दिवाळी यंदा खूप खास होती. दिवाळीच्या खास मुहूर्तावर मुनमुनने मुंबईत स्वत:साठी नवीन घर घेतलं आहे.
मुनमुनने सोशल मीडियावर तिच्या नवीन घराचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
मुनमुनने फोटोसह एक खास पोस्टही लिहिली आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं- नवीन घर…नवी सुरुवात.
तिने पुढे लिहिले, व्यस्त शूटिंगनंतर ती तिच्या नवीन घरात शिफ्ट झाले. माझ्या नवीन घरासाठी खूप उत्सुक आहे. हे एक स्वप्न होत जे सत्यात उतरलं आहे.
मुनमुनने दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. तिने नवीन घरात कुटुंब आणि मित्रांसोबत दिवाळी साजरी केली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here