आपल्या खेळाच्या जोरावर देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या महिला खेळाडूंचे पाऊल सध्या पुढे पडत आहे, अशा मैदानावर लढणाऱ्या रणरागिणींच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारा लेख…!

चूल आणि मूल या चौकटीतच अडकून न राहता त्यापलिकडील स्वकर्तृत्वाचे भावविश्‍व विश्‍व उलगडून विविध श्रेत्रात महिला आज आपला अनोखा ठसा उमटवत आहेत. शारीरिक व मानसिक क्षमतांचा कस लागणाऱ्या क्रिडा क्षेत्रातही महिला अव्वलस्थानी आहेत. परंतु, पुरुषसत्ताक पद्धतीमुळे आपल्याकडे महिला खेळाडूंची उपेक्षाच होते. यातून मार्ग काढत महिला खेळाडू पुरुष खेळाडूंपेक्षा कामगिरीत काकणभर पुढे आहेत. आपल्या खेळाच्या जोरावर देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या महिला खेळाडूंचे पाऊल सध्या पुढे पडत आहे, अशा मैदानावर लढणाऱ्या रणरागिणींच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारा लेख…

धावपटू पी.टी. उषा

धावपटू पी.टी. उषा
पिलावुलकांडी थेककेपरंबिल उषा (पी. टी. उषा) यांनी १९८० मध्ये कराची येथे झालेल्या ‘पाकिस्तान ओपन नॅशनल मीट’ने ॲथलिट म्हणून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. या ॲथलिटच्या मेळाव्यात त्यांनी भारतासाठी ४ सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले. त्यानंतर १९८२ मध्ये पी. टी. उषा यांनी ‘वर्ल्ड कनिष्ठ आमंत्रण मेळाव्यात’ भाग घेतला. यात २०० मीटर शर्यतीत तिने सुवर्णपदक आणि १०० मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकले. अॅथलेटिक्सचे मैदान गाजवणाऱ्या पी. टी. उषा, ऑलिंपिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला अॅथलिट आहेत. केरळमधील ‘उषा स्कूल ऑफ अॅथलेटिक्स’मधून त्या सध्या नवे खेळाडू घडविण्याचे काम करतात. पाययोली एक्स्प्रेस व सुवर्ण कन्या या टोपण नावांनीही त्या ओळखल्या जातात.

वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरी

वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरी
१९९२ मध्ये एशियन चॅम्पियनशिपमध्ये वेटलिफ्टिंगसारख्या ताकदवान खेळात कर्णाम मल्लेश्वरी यांनी ३ रौप्य पदक मिळवली. तर विश्‍व चॅम्पियनशिपमध्ये ३ ब्रॉंझ पदक पटकावली. त्यानंतर सन २००० मध्ये सिडनी ऑलिम्पिकमध्ये ब्रॉझपदक मिळवत इतिहास घडवला. ऑलिम्पिकमध्येही ब्रॉझपदक पटकाविणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू ठरल्या.

टेनिसपटू सानिया मिर्झा

टेनिसपटू सानिया मिर्झा
सानिया मिर्झाने ३ ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या मिश्र दुहेरीची तर एका ग्रँड स्लॅम स्पर्धेत महिला दुहेरी अशी एकूण ४ अजिंक्यपदे मिळवली आहेत. महिला दुहेरीचे अग्रमानांकन मिळवणारी ती पहिली भारतीय टेनिसपटू आहे. महिला एकेरीतही नामांकित खेळाडूंविरुद्ध विजय मिळवून तिने आपले टेनिसमधील वेगळेपण दाखवून दिले आहे. सानियाला भारत सरकारने अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते. तर २००६ साली पद्मश्री पुरस्कार देऊन तिला गौरविण्यात आले.

बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे
भाग्यश्री ठिपसे या जागतिक ग्रॅंड मास्टर स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या महिला बुद्धिबळपटू आहेत. पद्मश्री व अर्जुन पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. पाच वेळा त्यांनी राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले आहे. चेस ऑलिंपियाडमध्ये त्यांनी नऊ वेळा भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. १९११मध्ये महिला आशियाई स्पर्धेच्या त्या मानकरी ठरल्या.

शरीरसौष्ठवपटू ममता देवी

शरीरसौष्ठवपटू ममता देवी
भारताच्या पहिल्या महिला शरीरसौष्ठवपटू ममता देवी यांनी जागतिक शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवले. पुण्यात झालेल्या महिलांच्या शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक आपले नाव कोरले. व्हिएतनाममध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेतही त्यांनी कांस्यपदक पटकावले.

नेमबाज हीना सिधू

नेमबाज हीना सिधू
महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात हीना सिधू हिने राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. नेमबाजीच्या विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या हीनाला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘आयएसएसएफ’च्या जागतिक अजिंक्य स्पर्धेत तिने जितू रायच्या साथीने सुवर्णपदक मिळविले.

पोकर खेळाडू मुस्कान सेठी

पोकर खेळाडू मुस्कान सेठी
पोकर या पुरुषांचे वर्चस्व असलेल्या खेळात मुस्कान सेठी हिने
आपल्या कौशल्याच्या जोरावर अनोखे स्थान निर्माण केले. मुस्कान सेठी भारताची पहिली व्यावसायिक पोकर खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनेक प्रतिष्ठित पोकर स्पर्धांमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.बॅडमिंटनपटू सायना नेहवाल

बॅडमिंटनपटू सायना नेहवाल

बॅडमिंटनपटू सायना नेहवाल
ऑलिंपिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पदक मिळवणारी पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आहे. जागतिक बॅडमिंटन संघटनेच्या स्पर्धेत पदक मिळवणारी सायना एकमेव भारतीय खेळाडू आहे. सायनाच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी भारत सरकारतर्फे तिला पद्मभूषण, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

साक्षी मलिक

साक्षी मलिक
२०१६च्या रिओ ऑलिंपिकमध्ये कुस्तीत ५८ किलो वजनी गटात साक्षी मलिक हिने किर्गि‍झस्तानच्या अईसुलू टिनीबेकोवाला ८-५ असे हरवून कांस्यपदक पटकावून नवा विक्रम नोंदवला. कुस्तीमध्ये ऑलिंपिक पदक मिळवणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू आहे. ग्लासगो येथे २०१४मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने रौप्यपदक, आशियाई स्पर्धेत २०१५मध्ये ब्रॉंझ आणि २०१७मध्ये रौप्यपदक मिळवले. वयाच्या बाराव्या वर्षी तिने कुस्तीचा श्रीगणेशा केला. सन २०१० साली ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने पहिले पदक जिंकले.

डायना एडलजी

डायना एडलजी
डायना एडलजी या महिला एकदिवसीय क्रिकेट संघाच्या पहिल्या कर्णधार आहेत. महिला क्रिकेटमध्ये कसोटी सामन्यांच्या इतिहासात सर्वाधिक षटक टाकण्याचा (पाच हजार ९८पेक्षा अधिक चेंडू) विक्रम त्यांच्या नावावर आहे. पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९७८ आणि १९९३च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी भारतीय महिला संघाचे नेतृत्व केले.

कविता देवी

कविता देवी
कविता देवी या भारतीय व्यावसायिक कुस्तीपटू आहेत. २०१६मध्ये दक्षिण आशियाई स्पर्धेत ७५ किलो वजनी गटात पॉवर लिफ्टर म्हणून त्यांनी सुवर्णपदक मिळवले. जगप्रसिद्ध पॉवर लिफ्टर खली यांच्या मार्गदर्शनाखाली डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय पॉवर लिफ्टर आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

मिताली राज

मिताली राज
महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या मिताली राज हिने कर्णधारपदही भूषविले आहे. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली. मिताली राजने १२ मार्च २०२० रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ३५ धावा घेत दहा हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारी ती भारतातली पहिली, तर जगातली दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

मिशेल काकडे

मिशेल काकडे
मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते कोलकता, कोलकता ते चेन्नई आणि चेन्नई ते मुंबई हा ‘सुवर्ण चतुष्कोन महामार्ग’ विक्रमी वेळेत धावणाऱ्या पहिल्या भारतीय महिला धावपटू मिशेल काकडे यांच्या अनोख्या विक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये झाली आहे. सर्वाधिक वेळ धावण्याचा विक्रम, वाळवंटातील अल्ट्रामॅरेथॉनमध्ये धावण्याचा विक्रम, चार वाळवंटात धावणाऱ्या पहिल्या भारतीय धावपटू ठरल्या आहेत.

माझी कोम

माझी कोम
वयाच्या १७ व्या वर्षी मेरी कोमने बॉक्सिंग रिंगमध्ये पहिले पाऊल टाकले. सन २०००मध्ये तिने राज्यस्तरीय स्पर्धेचे जेतेपद मिळवले. सातव्या ईस्ट इंडिया महिला बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमने सुवर्णपदक पटकावले आणि त्यानंतर पुढच्या पाच वर्षांत सर्व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी बजावली. हिस्सार इथे झालेल्या दुसऱ्या आशियाई महिला बॉक्सिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पहिल्या सुवर्णपदावर मेरी कोमने आपले नाव कोरले. मेरी कोमला ‘मॅग्निफिसंट मेरी’ असे संबोधले जाते. पाच वेळा वर्ल्ड अमॅच्युअर बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकणारी मेरी कोम आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय बॉक्सर आहे. सहा जागतिक स्पर्धांमध्ये पदक मिळवणारी ती एकमेव भारतीय बॉक्सर आहे.

दीपा कर्माकर

दीपा कर्माकर
दीपा कर्माकरने २०१६च्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेमध्ये जिम्नॅस्टिक्समधील पात्रता फेरीत प्रवेश मिळवला. ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली ती पहिलीच भारतीय जिम्नॅस्ट आहे. २०१५च्या वर्ल्ड जिम्नॅस्टिक्स चँपियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी देखील ती पहिलीच भारतीय जिम्नॅस्ट आहे. २०१४मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही तिने ब्रॉंझ मेडल पटकावले आहे.

गीता फोगट

गीता फोगट
गीता फोगट ही भारतीय महिला कुस्तीपटू आहे. तिच्या दोन बहिणी बबिता कुमारी फोगट, विनेश फोगट आणि चुलतबहीण रितू फोगट यासुद्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या कुस्तीगीर आहेत. हरियानाच्या एका खेडेगावातून आलेल्या गीता फोगट हिने २०१०मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत फ्री स्टाइल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून इतिहास घडवला. तिने २०१२मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि आशियाई स्पर्धेत कांस्यपदक, तर २०१३च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक आणि २०१५च्या आशियाई स्पर्धेत बॉंझमेडल पटकावले आहे.

इशिता मालवीय

इशिता मालवीय
इशिता मालवीय या पहिल्या भारतीय व्यावसायिक महिला सर्फर आहेत. महिला सर्फिंग क्षेत्राची जागतिक दूत असलेल्या इशिता यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सागरी पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचे काम करणाऱ्या इशिता यांनी भारतीय किनारपट्टीला ‘आंतरराष्ट्रीय सर्फिंग डेस्टिनेशन’ बनवणे हे उद्दिष्ट ठेवले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here