मुंबई – कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम मनोरंजन विश्वातील सर्वाधिक चर्चेतील कार्यक्रम आहे. त्याचे चाहतेही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ या कार्यक्रमानं चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले आहे. त्या कार्यक्रमाची नेहमीच चर्चा असते. या कार्यक्रमातून अनेकजण लक्षाधीश आणि करोडपती झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर कौन बनेगाच्या 13 व्या सीझनची चर्चा आहे. एका एपिसोडमध्ये ग्वाल्हेरच्या गीता सिंह आल्या होत्या. त्यांनी चक्क या कार्यक्रमातून एक कोटी रुपये जिंकले आहेत. मात्र जेव्हा त्यांना सात कोटींसाठी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देणं जमलं नाही.

सोशल मीडियावरुन गीता सिंह यांना सात कोटींसाठी विचारण्यात आलेला प्रश्न होता तरी काय, असं विचारण्यात आलं आहे. गीता सिंह यांनी 9 नोव्हेंबरच्या एका एपिसोडमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गीता यांना एक कोटींसाठी विचारण्यात आलेला प्रश्न होता, पी के गर्ग आणि होमी डी मोतीवाला यांनी कोणत्या क्रीडा प्रकारातून राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त केला आहे. यावेळी गीता यांच्यासमोर गोल्फ, पोलो, नौकायन आणि आईस हॉकी हे चार ऑप्शन होते. त्यावर गीता यांनी नौकायन हे उत्तर दिलं होतं. त्यावेळी त्यांच्याकडे दोन लाईफ लाईन होत्या. मात्र त्यांनी त्याचा वापर न करता बरोबर उत्तर देत एक कोटी रुपये जिंकले.

या प्रश्नानंतर त्यांना सात कोटींसाठी अमिताभ यांनी प्रश्न विचारला. तो प्रश्न मात्र चांगलाच अवघड होता. तो असा की, खाली दिलेल्या नावांमधील असं कोणतं नाव जे अकबराच्या त्या तीन नातवांपैकी नाही ज्यांच नाव ज्यु मिशनऱ्यांकडे गेल्यानंतर पुन्हा बदण्यात आले होते.. त्याचे पर्याय होते, जो डॉन फिलिपे, डॉन हरिके, डॉन कार्लोस आणि डॉन फ्रान्सिस्को या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी गीता यांच्याकडे दोन लाईफ लाईन देखील होत्या. मात्र त्यांनी त्यांचा वापर केला नाही. आणि त्यांना या प्रश्नाचे उत्तरही माहिती नव्हते. त्यामुळे त्यांनी तो गेम क्विट करण्याचा निर्णय घेतला.

हे देखील वाचा: ‘तारक मेहता’च्या’ टप्पू – बबिताचं बिंग अखेर फुटलं

हे देखील वाचा: Movie Review; ‘जय भीम’ सणसणीत ‘चपराक’

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here