वजन कमी करण्यासाठी लोकं खूप प्रयत्न करत असतात. काहीजण रात्री भरपूर आणि मनसोक्त जेवतात. पण असे केल्याने  तुमचं वजन वाढू शकतं. त्यामुळे रात्री कमी प्रमाणात जेवणे गरजेचे आहे. पण असे झाले तरी वाढलेले वजन कमी कसे करायचे हा प्रश्न पडतोच. अशावेळी रात्री झोपण्यापूर्वी काही ड्रिंक्स घेतल्यास तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.

कॅमोमाईल चहा- चांगली झोप हवी असल्यास कॅमोमाईल चहा फायद्याचा ठरतो. हा चहा शरीरात ग्लाइसिनची पातळी वाढवण्यास मदत करतो. तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.त्यामुळे झोपण्यापूर्वी एक कप गरम कॅमोमाइल चहा नक्की प्या.

हळदीचे दूध – हळदीचे दूध सर्दी, खोकला आणि इतर आजारांवर गुणकारी आहे. हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट असल्याने ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात, त्यामुळे वजन कमी करण्यात आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी हळदीचा फायदा होतो.

प्रोटीन शेक- जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर झोपण्यापूर्वी प्रोटीन शेक घेणे आरोग्यासाठी चांगले आहे. प्रोटीन शेक मुळे कॅलरीज जास्त बर्न होतात. दुधामध्ये ट्रिप्टोफॅन आणि कॅल्शियम असते, यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. झोप चांगली झाली असेल तर वजनही कमी होण्यास मदत होते.

बीट, लिंबाचा ज्यूस- बीट किंवा लिंबूपासून बनवेलेली पेये आरोग्यासाठी अतिशय चांगली असतात. ते प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. तसेच वजनही खूप लवकर गतीने कमी होते.

दालचिनी चहा- आरोग्यासाठी दालचिनी अतिशय चांगली आहे. यामुळे तुमची चयापचय शक्ती वाढते. त्यात अँटिऑक्सिडंट आणि प्रतिजैविक गुणधर्म असल्याने ते डिटॉक्ससाठी फायद्याचे ठरते. तसेच अतिरिक्त चरबी यामुळे कमी होते. तुम्हाला त्याची चव आवडावी यासाठी त्यात मध घाला.

मेथीचे पाणी- मेथीचे दाणे भिजवायचे. हे मेथीचे दाणे घातलेले पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. मेथीचे पाणी रात्रीही पिता येऊ शकते. या बिया शरीरात उष्णता निर्माण करत असल्याने वजन कमी करण्यास मदत होते. तसेच पचनक्रियाही सुधारते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here