जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत, जी त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. ‘ही’ ठिकाणं पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात आणि इथं वेळ घालवतात. तुम्हालाही अशा सुंदर पर्यटन स्थळांना भेट द्यायची असेल, तर जाणून घ्या जगातील काही सुंदर ठिकाणांविषयी..
बोरा बोरा बेट Bora Bora Island (फ्रेंच पॉलिनेशिया) : हे दक्षिण पॅसिफिक बेट जगातील रोमँटिक बेटांच्या यादीत अग्रस्थानी आहे. येथील व्हाईट बीच, एक्वा लगून आणि लक्झरी हॉटेल्सचे सौंदर्य नजरेसमोर आल्याशिवाय राहत नाही.कोआई बेट, हवाई Kauai Island, Hawaii : अमेरिकेच्या हवाई बेटांमधील हे एक छोटसं बेट, जे आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हे ज्वालामुखी बेट असून येथील हवामान उष्णकटिबंधीय आहे, जे वर्षभर सारखेच राहते.इंद्रधनुष्य पर्वत, झांग्ये डांक्सिया, चीन Zhangye Danxia, China : हे ठिकाण पाहून तुम्हाला असं वाटेल की, तुम्ही एखादं पेंटिंग पाहत आहात. हा रंगीबेरंगी पर्वत पाहणं हा एक उत्तम अनुभव आहे. नैसर्गिकरित्या बनवलेले हे सुंदर पर्वत पाहण्यासाठी पर्यटक दुरून चीनला येतात.नॉर्दन लाइट्स, आइसलँड Northern Lights, Iceland : आइसलँड आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील रंगीबेरंगी पर्वत आणि ज्वालामुखीच्या नद्या तुम्हाला वेड लावतील. पण, सर्वात खास म्हणजे नॉर्दन लाइट्स. जगभरातील छायाचित्रकारांना त्यांच्या कॅमेऱ्यात नॉर्दन लाइट्स टिपण्याचे वेड आहे.नॉसवांस्टाइन कॅसल, जर्मनी Neuschwanstein Castle, Germany : दक्षिण जर्मनीमध्ये असलेल्या या वाड्याचे बांधकाम 19 व्या शतकात सुरू झाले. या वाड्याच्या बांधकामासाठी 1864 मध्ये बव्हेरियाचा राजा लुडविज-द्वितीय यांनी आदेश दिले होते. हा सुंदर महाल बांधण्यासाठी लुडविजला खूप कर्ज घ्यावे लागले. लुडविजच्या मृत्यूनंतर काही आठवड्यांतच ते लोकांसाठी खुले करण्यात आले.