‘संगीत सम्राट’ या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका, अभिनेत्री आणि प्रसिद्ध युट्यूबर उर्मिला निंबाळकरच्या मुलाचं बारसं नुकतंच पार पडलं. या बारशाचे फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

उर्मिलाने तिच्या मुलाचं नाव ‘अथांग’ असं ठेवलं आहे. अथांग म्हणजे ज्याचा ठाव लागत नाही असा.
बारशासाठी उर्मिला, तिचा पती सुकिर्त आणि उपस्थित पाहुण्यांनी निळ्या आणि पांढऱ्या रंगसंगतीचे कपडे परिधान केले होते.
३ ऑगस्ट रोजी उर्मिलाने मुलाला जन्म दिला. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली होती.
उर्मिलाने सुकिर्त गुमस्ते याच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या आठ वर्षांनंतर या दोघांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं.
बाळासोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत ती तिच्या भावना व्यक्त करत असते.
उर्मिलाने अभिनेत्री आणि त्यानंतर युट्यूब कंटेट क्रिएटर अशी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. प्रवास, लाइफस्टाइल, फॅशन यांसारख्या विषयांवर ती आणि तिचा पती मिळून व्हिडीओ बनवत असतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here