किरकटवाडी : खडकवासला धरणाच्या पाण्यात गणपती विसर्जन करुन देत नव्हते, त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, आता छटपुजा करण्यासाठी शेकडो महिला धरणाच्या पाण्यात उतरल्या, निर्माल्य व इतर वस्तू पाण्यात टाकल्या मग त्यामुळे पाण्याचे प्रदुषण होत नाही का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. पोलीस प्रशासन व पाटबंधारे विभागने याबाबत दुटप्पी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

बुधवार दि. 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी व गुरुवार दि. 11 नोव्हेंबर रोजी पहाटे खडकवासला धरण चौपाटी परिसरात छटपुजा करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. थेट पाण्यात उतरून हा पूजाविधी करण्यात आला. पुजेचे साहित्य, निर्माल्य व इतर वस्तू पाण्यात टाकण्यात आल्या. त्यामुळे कचऱ्याचा खच पाण्यात पडलेला असल्याचे दिसून येत आहे.

धरणाचे पाणी छटपुजेमुळे दुषित होत नाही का?

धरणाचे पाणी छटपुजेमुळे दुषित होत नाही का?

दुसऱ्या बाजूला गणपती विसर्जनाच्या दिवशी पोलीसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. कोणालाही पाण्यात सोडले जात नव्हते. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या होत्या. छटपुजेसाठी असे कोणतेच नियम न घालण्यात आल्याने पोलीस व इतर विभागांच्या दुटप्पी भूमिकेबाबत नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा: नागपूर परिषद निवडणूक : उमेदवाराच्या निवडीसाठी कॉंग्रेसची चाचपणी

“गणपती विसर्जनासाठी गेल्यावर पोलीस हाकलून लावत होते. छटपुजेसाठी मात्र प्रशासनाने काहीही नियम ठेवले नाहीत. शेकडो महिलांनी छटपुजेसाठी गर्दी केली होती. धरणात मोठ्याप्रमाणात कचरा टाकण्यात आला. गणपतीपुळे जलप्रदूषण होते मग छटपुजेमुळे होत नाही का?” प्रविण आग्रे, नागरिक, खडकवासला.

“छटपुजेबाबत कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने धरणात उतरण्यास प्रतिबंध करण्यासाठी कर्मचारी किंवा सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले नव्हते.” राजेंद्र राऊत, खडकवासला धरण शाखा अभियंता. “छटपुजेसाठी आमच्याकडे कुणी परवानगी मागण्यास आले नाही. तसेच कोणाची तक्रारदेखील आलेली नाही. धरणामध्ये उतरणे ही आमच्या अखत्यारीतील बाब नाही.” सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here