मुंबई – आपल्या बेताल आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे कंगना नेहमीच चर्चेत असते. आताही ती चर्चेत आली आहे. मात्र यावेळी तिनं केलेलं वक्तव्य कंगनाला महागात पडताना दिसत आहे. एका पुरस्कार सोहळ्यामध्ये कंगनानं देशाला जे स्वातंत्र्य मिळालं ते कशाप्रकारे मिळाले याविषयी भाष्य केलं आहे. कंगनानं सांगितलं की, आपल्याला 1947 साली जे स्वातंत्र्य मिळालं होतं ती भीक होती. आता आपण जे स्वातंत्र्य भोगतो आहोत ते खरं स्वातंत्र्य आहे. कंगनाची ही प्रतिक्रिया अनेकांसाठी धक्कादायक ठरली आहे. त्यामुळे कंगनावर सोशल मी़डियातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही व्हायरल झाल्या आहेत.

कंगनाच्या त्या वक्तव्यावर वरुण गांधी यांनी व्टिट केले होते. कधी महात्मा गांधी यांच्या त्यागाचा, तपस्या अपमान करणं तर कधी त्यांच्या हत्या करणाऱ्यांचा सन्मान करणं आणि आता शहीद मंगल पांडे पासून राणी लक्ष्मीबाई, भगत सिंह, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासहित लाखो स्वातंत्र्यवीरांचा सेनानींचा अपमान तिनं केला आहे. अशी प्रतिक्रिया वरुण गांधी यांनी दिली होती. त्यावर कंगनानं त्यांना थेट उत्तर दिलं आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वीच कंगनाला देशातील सर्वोच्च अशा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर तिनं अशाप्रकारचे वक्तव्य करणं यामुळे ती चर्चेत आली आहे.

आता कंगनानं वरुण गांधींना दिलेल्या उत्तरामध्ये लिहिलं आहे की, मी तेव्हा सांगितलं होतं की, 1857 मध्ये पहिल्यांदा भारताच्या स्वातंत्र्याची लढाई सुरु झाली. मात्र त्या लढाईला काळाच्या पडद्याआड घालवण्यात आलं. मात्र जेव्हा ब्रिटिश हुकूमत आल्यानंतर क्रुरता आणि अत्याचार वाढीस लागली. त्यानंतर काही काळानंतर गांधी यांच्या भीक मागण्याच्या कटोऱ्यातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. जा आता आणि रडा…अशी प्रतिक्रिया कंगनानं वरुण गांधी यांना दिली आहे. “सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांना हे माहित होतं की रक्तपात झाला तरी हिंदुस्तानी हा हिंदुस्तानीवर वार करणार नाही. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत मोजली हे खरं. पण ते स्वातंत्र्य नव्हतं, भीक होती. खरं स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळालं,” असं कंगना ‘टाइम्स नाऊ’च्या समिटमध्ये म्हणाली होती.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here