हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. वातावरणात गारवा वाढला आहे. त्यामुळे आता अनेकांनी स्वेटरला उन दाखवायला सुरू केले आहे. तसेच या काळात गरमागरम भाज्यांचे सूप पण आवर्जून प्यायले जाते. या ऋतूमध्ये त्वचा कोरडी होते. वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला, ताप अशा समस्या येतात. त्यामुळे हिवाळ्यात आहाराची काळजी घेणे गरजेचे आहे. हिवाळ्यात संतुलित आहाराबरोबरच तुम्ही आवळ्याचे सेवन करणे गरजेचे आहे. आवळ्यामुळे आजारांपासून रक्षण होते.

व्हिटॅमिन-सी, ए, पॉलिफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स हे घटक आवळ्यात असतात. अनेक प्रकारच्या संसर्गापासून आवळा आपल्याला वाचतो. तसेच आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ फार्मास्युटिकल्समध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की आवळ्यामध्ये मजबूत बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. म्हणून आवळा खाल्यावर साथीचे आजार टाळता येतात.

शिवाय तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारायचे असेल तर आवळा खाणे चांगले समजले जाते. आवळा त्वचा हायड्रेट करण्यातही मदत करतो. म्हणूनच आवळा सुपरफूड असून त्याचे थंडीत सेवन केल्याने वजन कमी होण्यासही मदत होईल. तसेच आहारातही तो सामाविष्ट केल्यास अनेक फायदे होतील.

आवळा

आवळा

असा करता येईल उपयोग

-आवळा किसून तो भाज्या आणि सॅलेडमध्ये वापरता येईल.

-आंबट आवळा खाण्यायोग्य करायचा असेल तर त्यात मीठ, हळद घालून खाता येऊ शकते.

-आवळ्याचा रस बाटलीबंद करून त्याच्या ज्यूस पिता येईल. त्यात आवडीप्रमाणे गूळ, जिरं आणि काळी मिरी पावडर टाकता येऊ शकते.

– आवळ्याचे लोणचे, मुरंबा करता येईल.

– याशिवाय गाजर आणि आवळ्याचा रस प्यायला जाऊ शकतो. गाजरात भरपूर बीटा-कॅरोटीन असते, जे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. व्हिटॅमिन-ए आणि सी यांचे मिश्रण शरीराला चांगेल ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here