India vs New Zealand: कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विश्वविजेता न्यूझीलंड टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारत दौऱ्यावर येणार आहे. १७ नोव्हेंबर पासून खेळवण्यात येणाऱ्या दौऱ्यात ३ टी२० आणि २ कसोटी सामने खेळले जाणार आहेत. टी२० मालिकेसाठी भारताचा संघ निवडण्यात आला आहे. पण कसोटी मालिकेसाठी संघ नंतर निवडण्यात येणार आहे. टी२० कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालेल्या विराट कोहलीला टी२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. रोहितला त्याच्या जागी कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. पण या मालिकेनंतर होणाऱ्या कसोटी मालिकेबाबत एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे.

रोहित शर्मा
हेही वाचा: IND vs NZ: “हा विराटने रोहितचा केलेला अपमान”; गावसकर भडकले…
भारताचा संघ गेल्या सात-आठ महिन्यांपासून सलग क्रिकेट खेळतोय. आधी ऑस्ट्रेलिया दौरा, त्यानंतर इंग्लंडविरूद्धची मालिका, मग विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी, पाठोपाठ इंग्लंड दौरा, त्यालगोलग IPL आणि आता टी२० वर्ल्ड कप असा मोठा कार्यक्रम भारतीय खेळाडूंच्या गाठीशी होता. या साऱ्या गोंधळानंतर भारताचा नवा कर्णधार रोहित शर्मा हा कसोटी मालिकेला मुकण्याची दाट शक्यता आहे. विश्रांतीच्या कारणास्तव टी२० मालिकेनंतर तो संघाबाहेर जाणार असल्याची चर्चा आहे. विराट कोहलीदेखील पहिल्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांच्या चिंतेत वाढ झाल्याचे चित्र आहे.

टीम-भारत-कसोटी
हेही वाचा: Video: भरमैदानात आफ्रिदीची ‘ती’ कृती.. भारतीय फॅन्सचा संताप!
सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार, भारताचे दोन स्टार खेळाडू रोहित आणि विराट हे नसताना कसोटी संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे असणार आहे. परंतु, संघाचा उपकर्णधार कोण असेल? यावर अद्याप निर्णय झालेला नाही असंही बोललं जात आहे.
Esakal