टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या पाकिस्तानी संघाचा खेळ ऑस्ट्रेलियाने खल्लास केला. ऑस्ट्रेलियाच्या विजयात डेविड वॉर्नरने (David Warner) 49 धावांची खेळी करत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 11 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर शदाब खानने (Shadab Khan) मोहम्मद रिझवान करवी वॉर्नरला झेलबाद केले.

बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झाला नसताना मैदानातील पंचांनी त्याला बाद दिले. दोन रिव्ह्यू बाकी असताना वॉर्नरने त्याचा वापर न करता मैदानात सोडले. जर वॉर्नरने रिव्ह्यू घेतला असता तर तो कदाचित अर्धशतक पूर्ण करुन आणखी काही काळ पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरला असता. पण ही एक विकेट फुकट मिळूनही पाकिस्तानला जिंकता आले नाही.

डेविड वॉर्नरने 30 चेंडूत 49 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 3 षटकार खेचले. 10 षटकानंतर ऑस्ट्रेलियाने 3 विकेट गमावून 89 धावा केल्या होत्या. वॉर्नरची विकेट पडल्यामुळे पाकिस्तानचा संघ सामन्यात आला. पण ही फुकटची विकेट मिळवूनही त्यांना अखेर पराभवाचा सामना करावा लागला. मॅथ्यू वेड आणि स्टोयनिसने 82 धावांची धामाकेदार खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

हेही वाचा: Bye Bye Pakistan ट्विटरवर ट्रेंडिंग.. पाहा भन्नाट विनोदी मीम्स

समालोचन करणाऱ्या भारताच्या माजी क्रिकेटर गौतम गंभीरने सामना सुरु असताना यावर भाष्य केल्याचे पाहायला मिळाले. रिप्लायमध्ये बॉल आणि बॅट यांच्यात संपर्क दिसत नसला तरी नेमंक काय झालं ते फलंदाजाला चांगलं माहित असते. वॉर्नरने मैदानात सोडल्याचे गंभीर म्हणाला.

हेही वाचा: T20 WC PAKvsAUS : दुसऱ्या सेमी फायनलमध्ये काय घडलं!

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात यंदाच्या हंगामातील फायनल सामना खेळवण्यात येईल. दुबईच्या मैदानात 14 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्यांदा फायनल खेळायला उतरेल. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहचला आहे. 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाला इंग्लंडने पराभूत केले होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here