हिवाळा आला की लोक आंघोळ करण्यासाठी आळसपणा करतात. अनेकजण हिवाळ्यात आंघोळ करणे टाळतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आळस आणि थंड पाणी. अशा परिस्थितीत ऑफीसमध्ये जाणे लोकांसाठी खूप कठीण काम असते. ऑफीसला जाण्यासाठी हिवाळ्यात त्यांना सकाळी उठून आंघोळ करावी लागते. दुसरीकडे, जर आपण महिलांबद्दल बोललो तर, हिवाळ्यात केस धुण्याची सर्वात मोठी समस्या असते. थंड पाण्यामुळे महिलांना केस धुण्यापूर्वी अनेक वेळा विचार करावा लागतो. जर तुम्हालाही हिवाळ्यात या सर्व समस्यांना सामोरे जावे लागतयं, तर चला मग असे काही टिप्स जाणून घेऊयात, ज्याद्वारे तुम्ही हिवाळ्यात आंघोळ न करताही फ्रेश राहू शकता.

जर तुम्हाला हिवाळ्यात आंघोळ करावीशी वाटत नसेल तर तुम्ही वाइप्सचा अवलंब करू शकता. हिवाळ्यात या वाइप्सच्या मदतीने तुम्ही संपूर्ण शरीर पुसून टाकू शकता. वाइप्समध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल घटक तुम्हाला ताजेतवाने राहण्यास मदत करतात.
ज्या महिला मेकअपचा वापर करतात, त्यांनी रात्रीच्या वेळी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करुन झोपताना मॉइश्चरायझर वापरा. यामुळे तुमच्या त्वचेची पोर्स ब्लॉक होत नाहीत आणि तुम्ही सकाळी फ्रेश फिल कराल. यासोबतच हात आणि पायांवरही मॉइश्चरायझर वापरा.
हिवाळ्यात अंघोळ न करता तुमचे शरीर फ्रेश ठेवण्यासाठी तुमचे अंडर गार्मेंटस दररोज बदला. हे तुमच्या शरीरात बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखते.
हिवाळ्यात केस धुणे खूप कठीण होते, अशावेळी तुम्ही ड्राय शॅम्पू वापरू शकता. हे पावडरसारखे आहे, यासाठी केस ओले करण्याची गरज नाही. यामुळे तुमची तेलकट केसांची समस्या दूर होऊ शकते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here