ऑनलाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्म Veranda Learning Solutions Ltd ने प्रारंभिक शेअर विक्रीद्वारे (Initial share sale) 200 कोटी रुपये उभारण्यासाठी कॅपिटल मार्केट रेग्युलेटर सेबीकडे प्राथमिक कागदपत्रे दाखल केली आहेत. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, आयपीओ (IPO) इक्विटी शेअर्सची प्राथमिक पायरी आहे. कंपनी 50 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सच्या खाजगी प्लेसमेंटचा विचार करू शकते.

आयपीओची आवश्यकता का ?

पब्लिक इश्यूमधून मिळालेली रक्कम कर्जाची परतफेड किंवा प्रीपेमेंट, एड्युरेकाचे अधिग्रहण आणि विकास कामांसाठी वापरली जाईल असे कंपनीने म्हटले.

IPO

IPO

कंपनी काय करते?

Veranda हे एक सर्वसमावेशक ऑनलाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे. हे विद्यार्थी, पदवीधर व्यावसायिक आणि कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना ऑनलाइन, ऑफलाइन हायब्रिड आणि ऑफलाइन ब्लेंड फॉर्मेटमध्ये इंटिग्रेटेड लर्निंग सॉल्यूशन्स देते.

Edureka संपादन

सप्टेंबरमध्ये Veranda ने IT उद्योगासाठी लाइव्ह-इन्स्ट्रक्टरच्या नेतृत्वाखालील ऑनलाइन सोल्यूशन्स देणाऱ्या एड्युरेकाला 245 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. यापूर्वी Veranda ने बँकिंग, एसएससी आणि पीएससी परीक्षांसाठी प्रशिक्षण देणारी संस्था चेन्नई रेस कोचिंगदेखील विकत घेतली होती.

IPO

IPO

सिस्टेमॅटिक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड (Systematix Corporate Services Limited) ही इश्यूची बुक रनिंग लीड मॅनेजर आहे. कंपनीचे इक्विटी शेअर्स BSE आणि NSE वर लिस्ट केले जातील.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here