सानियाच्या फॅशनेबल लूकची टी२० वर्ल्ड कपमध्ये चांगलीच चर्चा रंगली
टी२० वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये पाकिस्तानला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये धडक मारली.पाकिस्तानच्या विविध सामन्यांसाठी पाक क्रिकेटर शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झा हिने हजेरी लावली. त्यामुळे तिच्या बोल्ड & ग्लॅमरस लूकची जोरदार चर्चा रंगली.पाकिस्तानच्या संघाला चीअर करण्यासाठी सानिया स्टेडियममध्ये उपस्थित होती.सानियाच्या छोट्या छोट्या अदा कैद करण्यात कॅमेरामन यशस्वी झाले. सोशल मिडियावर हे फोटो चांगलेच व्हायरल झाले.सानियाच्या अदा आणि तिचे स्मितहास्य पाहून तिला टी२० वर्ल्डकपमध्ये नवा चाहतावर्ग मिळाला.सानियाच्या सौदर्याचं नेहमीच कौतुक केलं जातं. ती कायम चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते.सानियाच्या सोबत स्टेडियममध्ये तिचा मुलगा अझानदेखील आपल्या बाबांची खेळी पाहण्यासाठी आल्याचे दिसले.पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाशी पराभूत झाला त्यावेळीही सानिया स्टेडियममध्ये होती.संपूर्ण सामन्यात ती पाकिस्तानच्या संघाचे मनोधैर्य वाढवताना दिसली.इतर खेळाडूंच्या पत्नी, मुला-मुलींसोबत सानिया पाकिस्तानच्या सामन्यांना हजेरी लावत होती.सानियाच्या बोल्ड अन् बिनधास्त अंदाजामुळे तिला काही वेळा टीकेचा सामना करावा लागतो. पण ती अशा ट्रोल्सना फारसं महत्त्व न देता आपलं कौटुंबिक आणि सामाजिक जीवन योग्य पद्धतीने जगते.