अभिनेत्री स्वरा भास्कर Swara Bhasker नेहमीच तिच्या ट्विट्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. ट्रोलर्सना दुर्लक्ष न करता ती अनेकदा सडेतोड उत्तरं देते. स्वराने नुकताच तिचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला. या फोटोवर एका नेटकऱ्याने कमेंट केलं, ‘तुझ्यापेक्षा आमची मोलकरीण चांगली दिसते’. नेटकऱ्याच्या या कमेंटवर स्वराने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे. बुधवारी स्वराने साडी परिधान केलेला स्वत:चा फोटो ट्विटरवर पोस्ट केला.
मोलकरीण तुझ्यापेक्षा चांगली दिसते असं म्हणणाऱ्याला स्वराने उत्तर दिलं, ‘तुमची मोलकरीण सुंदर असेल याची मला खात्री आहे. तुम्ही तिच्या कामाचा आदर करत असाल आणि तिच्यासोबत मूर्खासारखं वागत नसणार अशी मी अपेक्षा करते.’
हेही वाचा: उर्मिलाच्या बाळाचं बारसं; मुलाच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा

स्वराने ‘तनू वेड्स मनू’, ‘रांझना’, ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘नील बट्टे सन्नाटा’, ‘वीरे दी वेडिंग’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. गेल्या वर्षी तिचा ‘रसभरी’ हा ओटीटी प्रोजेक्ट चर्चेत होता. तिचा ‘शीर कुर्मा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिच्यासोबत दिव्या दत्ता आणि शबाना आझमी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
Esakal