‘मैत्रीचं पारडं नेहमीच जड असतं’ हे बिग बॉस मराठी ३च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये पहायला मिळालं.
कॅप्टन्सीच्या कार्यामध्ये घरातील सदस्यांना त्यांच्या काही गोष्टी गमवाव्या लागल्या. मीराला तिचे सॉफ्ट टॉइस आणि कुटुंबीयांचे फोटो गमवावे लागले. या टास्कमध्ये दादूस यांना त्यांचे केस कापावे लागले. तर विशाल निकम आणि विकास पाटील यांच्या मैत्रीची एक वेगळीच बाजू पहायला मिळाली. विकास पाटीलने बिग बॉसला सांगितलं की, विशाल निकम कॅप्टन बनावा यासाठी मी टक्कल करायला तयार आहे. विशालने विकासचे केस कापायला सुरुवात केली आणि विकाससोबतच विशालनेदेखील स्वत:चं टक्कल केलं. हे चित्र पाहून घरातील सर्व सदस्य आश्चर्यचकीत आणि भावूक झाले होते. विकास आणि विशाल यांनी आमची मनं जिंकली, अशा प्रतिकिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. बिग बॉसच्या घरातील सर्वात सुंदर क्षण, अशाही शब्दांत काहींनी भावना व्यक्त केल्या. टक्कल केल्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि त्यानंतर विकासने विशालसाठी स्वत:चं मत दिलं. आता हा टास्क कोण जिंकेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.