राज्यात मागील एक आठवड्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी सुरु आहे. एकमेकांवर आरोपप्रत्यारोपाच्या माध्यमातून एकमेकांवर टीका चालु आहेत. दरम्यान एसटी महामंडळाने आता शिवशाही बसेसना खासगी चालकांची परवानगी देऊन बस सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त समोर येत आहे. एसटीची चाके थांबल्याने प्रवाशांचे मात्र हाल सुरु आहेत. दरम्यान आता भाजपाच्या निलेश राणे यांनी या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा: भाजपाच्या माजी मंत्र्याने मंदिराची शेकडो एकर जमीन हडप केली -नवाब मलिक
निलेश राणे यांनी टि्वट करत ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ते म्हणाले, जगात काय चाललंय आणि आपण महाराष्ट्रात काय करतोय? हॉंगकॉंग शहरामध्ये झोपा काढायला बसेस चालू झाल्या आहेत. महाराष्ट्रमध्ये एसटी बस कामगार पगार वाढवून मिळावा म्हणून आंदोलन करत आहेत. मुंबईतली बीईएसटी पण व्हेंटिलेटरवरच आहे. ठाकरे सरकारने महाराष्ट्राचं वाटोळं केलं आहे. असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी जवळपास आठवड्यापेक्षा जास्त काळापासून संप पुकारला आहे. यामुळे (MSRTC Strike) परिवहन महामंडळाचे (MSRTC) तब्बल 126 कोटी 49 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एसटीचा संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने मास्टर प्लॅन तयार केल्याचे समजते आहे. ST कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता संपातील कर्मचाऱ्यांचे पगारही बंद करणार? अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा: T20 WC – पाकच्या पराभवानंतर अख्तरला शब्द सुचेनात; पाहा VIDEO
Esakal