श्रुती हसनने इंस्टाग्रामवर एका फॅशन शूटमधील काही फोटो शेअर केले आहेत, जिथे तिने शाही पन्ना सिल्क साडी नेसलेली आहे.

चित्रपटांमध्ये पदार्पण केल्यापासून श्रुती हसनने फॅशनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेले दिसून येतात. श्रुती सहसा तिच्या वॉर्डरोबमधील काळ्या रंगाच्या ड्रेसेसला जास्त प्राधान्य देते, परंतु ती कधी कधी असं कॉम्बिनेशन निवडते, ज्यात ती एखाद्या राणीसारखी दिसते.
श्रुतीने यावेळी एमराल्ड ग्रीन सिल्क साडी निवडली. मोहक पन्ना एमराल्ड ग्रीन सिल्क साडीला मोती आणि जरीमध्ये हाताने भरतकाम केलेले डिझाइन आहेत. श्रुती हाताने विणलेल्या जरीच्या पट्टेदार ब्लाउजसोबत साडीचे कॉम्बिनेशन केलेले दिसत आहे.
अॅक्सेसरीजसाठी तिने मोत्याचा हार, झुमके आणि बांगड्या निवडल्या आहेत. श्रुतीने ओठ आणि डोळे हायलाइट करण्यासाठी सॉफ्ट मेकअप लूक निवडलाय. तिने मॅचिंग ग्रीन बिंदीने तिचा लूक पूर्ण केला.
श्रुतीची साडी दिप थी आणि दागिने शीतल झवेरी बाय विठ्ठलदास यांनी डिझाईन केले आहेत. जर तुम्ही तुमच्या फेस्टिव्ह लूकसाठी ही साडी निवडण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अधिकृत वेबसाइटवरून ती खरेदी करू शकता. त्याची किंमत 43,800 रुपये आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here