२०२४ ला जेव्हा ‘सोमानिओ’ लाँच होईल तेव्हा ती जगातील सर्वात मोठ्या खाजगी निवासी नौकांपैकी एक असेल, ६०० दशलक्ष डॉलरच्या या जहाजाच्या अंतरंगाचं अनावरण नुकतंच करण्यात आलं. जगातील पहिले “यॉट लाइनर” म्हणून वर्णन सोमालिओचं वर्णन केले जात आहे.

– सोमालिओ ७२८ फूटाची जगातील सर्वात मोठी निवासी Yacht ठरेल. सध्या ६४३ फूटाची द वर्ल्ड ही जगातील सर्वात मोठी खाजगी निवासी नौका आहे, ज्यामध्ये स्टुडिओ तसेच एक ते तीन बेडरूमचे अपार्टमेंट आहेत. सोमालिओ ही एक अलिशान Yacht असून सोमनीओवरील लक्झरी अपार्टमेंट प्रत्यक्षात कशी दिसतील ते आपण पाहूया.

लॅटिनमध्ये सोमानिओचा अर्थ स्वप्न पाहणे असा होतो. स्वीडनच्या विंच डिझाईन आणि टिलबर्ग डिझाईन यांनी याचं डिझाइन केले आहे आणि नॉर्वेजियन शिप डिझाइनर आणि बिल्डर VARD द्वारे तयार केले जाईल. डिझायनर्सच्या मते, टिकाऊपणा हा Somnioची प्राथमिकता आहे आणि लेटेस्ट क्लीन टेक्नॉलॉजीने ते बनवले आहे. शिवाय जिथं शक्य असेल तिथं पर्यावरणपूरक इंटिरियर डिझाइन केलं जाणार आहे.
येथील सर्व ३९ फ्लोटींग अपार्टमेंट्स खाजगी बाल्कनी किंवा टेरेससह आहेत. शिवाय विशाल शेल-आकाराचे बेड, समुद्राच्या दृश्यांसह विस्तीर्ण राहण्याची जागा आणि भिंतीच्या लांबीचे आरसे यांचा समावेश आहे. अपार्टमेंटची किंमत सुमारे ११ दशलक्ष डॉलरपासून सुरू होते आणि आकार १६०० ते ६५०० स्क्वेअर फूट पर्यंत आहे.
लुटेनबर्गर डिझाइनसह स्वीडनच्या विंच डिझाइन, टिलबर्ग डिझाइनद्वारे इंटेरियर तयार केले गेले. जिम, लायब्ररी, डायनिंग स्पेस, ड्रेसिंग एरिया आणि २७० -डिग्री फॉरवर्ड व्ह्यूसह विशाल लिव्हिंग रूम स्पेस” हे पर्याय उपलब्ध आहेत. येथे जागा घेणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल.
ऑनबोर्ड उपलब्ध असलेल्या शेअर ऑन बोर्ड सुविधांमध्ये 10,000 बॉटल क्षमतेचे वाईन सेलर आणि टेस्टिंग रूमसह एक लाउंज, एक स्पा, एक चित्रपटगृह, रेस्टॉरंट्स आणि बीच क्लब यांचा समावेश आहे.
जगातील एकमेव निवासी सुपरयाट म्हणून आमच्या अचूक मानकांना पूरक असलेल्या डिझायनर्ससोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे,” असे सोमानियोचे सह-संस्थापक कॅप्टन एरिक ब्रेधे यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
इंधन आणि अन्नासह देखभाल आणि दुरुस्ती यांसारखे खर्च भागवण्यासाठी रहिवाशांकडून वार्षिक शुल्क आकारले जातील. येथील काही अपार्टमेंट आधीच विकली गेली आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here