दिवसाची सुरूवात करताना ब्रेकफास्टमध्ये हेल्दी आहार किंवा पेयांचा समावेश करणे गरजेचे आहे, पण जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करता, तेव्हा मात्र तुम्हाला जास्त काळजी घ्याव लागेल. दिवसाची सुरूवात करताना तुम्ही काय खाता किंवा काय पिता याकडे लक्ष द्यायला हवे. तुम्ही जे अन्न खाता आणि जे पेय पिता(पाणी सोडून) सर्वांमध्ये काही प्रमाणात कॅलरीज असतात. सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये कमी-कॅलरीज असलेले आणि पौष्टिक पेय घेतल्यास चयापचय वाढू शकतो आणि फॅट बर्न करण्यासाठी मदत होते. प्रत्येकाला सकाळच्या वेळी वेगवेगळे पेय आवडत असतील पण, आम्ही तुम्हाला असे काही पेय सांगणार आहोत जे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी देखील मदत करतील.

ब्लॅक कॉफी (​Coffee) –

कॉफी हे बहुतांश लोकांचे आवडते पेय आहे आणि खर तरं कॉफीसोबत दिवस सुरु करण्यामध्ये काहीच वाईट नाही पण ती तुम्ही काळजीपूर्वक ती बनवयाला हवी. वजन कमी करण्यासाठी विचार करता असाल तर तुम्ही विना साखरेची ब्लॅक कॉफी घ्या. कॉफीमध्ये साखर आणि दुध अॅड केल्यास त्यामधील कॅलरीज काऊंट वाढतो आणि तुम्ही रोजचा डाएट प्लॅन खराब होऊ शकतो. आणि त्याच बरोबरो तुम्ही दिवसातून फक्त दोन वेळा कॉफी घ्या अन्यथा… अतिप्रमाणात कॉफी घेण्याचे परिणाम जसे की, झोप न येणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, सुज येणे जाणवतील.

ग्रीन टी(Green tea) –

वजन कमी करण्यासाठी ग्रीन टीला खूप पसंती दिली जात आणि जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा ग्रीनटी घेण्याचे अनेक कारणे आहेत. अभ्यासानुसार, ग्रीन टी मुळे तुमच्या शरीरातील फॅट बर्निंग प्रक्रियेचा वेग वाढतो आणि एक्सरसाईज करताना तुमचा परफॉरमन्स देखील सुधारतो. या पेयातील मुख्य घटत कॅटेचिन आहे जे सर्व आरोग्यदायी फायद्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही इतर प्रकारचे हर्बल ब्रू जसे हिबिस्कस टी, ओलोंग चहा देखील घेऊ शकता. अधिक फायद्यांसाठी नेहमी चहाच्या पिशव्यां ऐवजी चहाची पाने वापरा

भाज्या किंव फळांचा रस (Vegetable or fruit juice)
– एक ग्लास ताज्या फळांचा किंवा भाज्यांचा रस तुम्हाला चांगल्या प्रमाणात पोषक तत्वे देतो. या रसामध्ये कमी कॅलरीज असतात आणि त्यामुळे तुमचे चयापचय वाढू शकते.

एक ग्लास रस करताना तुम्ही फळे किंवा भाज्या देखील मिक्स करू शकता. सकाळी एक ग्लास ज्युस घेतल्यास तुमची कॅलरीज बर्न करण्याची प्रक्रियेचा वेग वाढतो आणि तुम्हाला पुढच्या जेवणापर्यंत तुमचे पोट भरल्यासारखे वाटते.

स्मुदी (Smoothie)

काही फळे आणि ड्राय फ्रुट्स घालून बनवलेला एक ग्लास स्मूदी हा एक परिपूर्ण नाश्ता आहे. त्यामुळे तुम्हाला दुध, फळे आणि ड्राय फ्रुटस् अशा आरोग्यदायी पदार्थांचा फायदा तुम्हाला मिळतो. तुम्ही एक ग्लास स्मुदी घेतले तरी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी आवश्यक पौषक तत्वे मिळतात. तुम्हाला जर आणखी पौषक तत्वे वाढवायची असतील तर तुम्ही प्रोटीन पावडर देखील अॅड करू शकता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here