
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर सोशल मीडियावर सक्रिय असते.

ती तिचे निरनिराळे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

काही दिवसांपूर्वी पुत्ररत्न प्राप्त झाल्याची माहिती धनश्रीनं सोशल मीडियावरुन चाहत्यांना दिली होती.

धनश्रीनं यापूर्वी ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकांमध्येही काम केलंय.

सध्या धनश्री छोट्या पडद्यापासून दूर आहे. त्याच कारण म्हणजे तिनं नुकतच गोंडस बाळाला जन्म दिलाय.

अभिनेत्री धनश्री काडगावकर ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रसिद्धिझोतात आली.

धनश्रीनं नुकतंच तिचं एक फोटोशूट शेअर केलंय, ज्यात तीनं लाल साडी नेसलीय, या फोटोला तिनं ‘इव्हेंट रेडी’ असं कॅप्शनही दिलंय.
Esakal