पर्व फिल्म्स प्रस्तुत आणि विश्वजीत विठ्ठल पाटील यांची निर्मिती असलेल्या पिरेम या आगामी मराठी सिनेमाद्वारे मुलगी झाली हो या गाजलेल्या मालिकेतील अभिनेत्री दिव्या पुगावकर रूपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. त्यापूर्वी विठू माऊली या गाजलेल्या मालिकेतही दिव्याने काम केले होते आणि ती भूमिकाही गाजली होती. सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू असलेल्या मुलगी झाली हो या मालिकेतील मुख्य भूमिकेत काम करत असलेल्या दिव्या आता घराघरांत पोहोचली आहे.





Esakal