मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री कंगनानं आपल्या वादग्रस्त वक्तव्याचा धडाका कायम ठेवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कंगनाच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली. तिला नुकतचं पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात आले. मात्र त्यानंतर एका कार्यक्रमामध्ये तिनं देशाच्या स्वातंत्र्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामुळे कंगनानं अनेकांना राग ओढावून घेतला आहे. कंगना नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसांठी ओळखली जाते. आता पुन्हा तिनं मोठा बॉम्ब टाकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राजस्थानातील चार ठिकाणी कंगनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







Esakal