अभिनेत्री अनुष्का शर्मा हळुहळू पुन्हा कामाच्या क्षेत्रात (वर्क फिल्ड) परतत आहे. यापूर्वी तिने अनेक शूटमध्ये सहभाग घेतला आहे. याशी संबंधित एका मॅगझिन फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर समोर आले आहेत. हे फोटो अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. यामध्ये ती इतकी सुंदर दिसत आहे की, तिला पाहून नेमका अंदाज लावणे कठीण झाले आहे की, ही आता एका मुलाची आई झाली आहे. तिच्या ग्लॅमरस लूकसमोर इतर अभिनेत्रींच्या लेटेस्ट फोटोशूट फिके दिसू लागले आहे.

या फोटोमध्ये, अनुष्का एक शीयर टॉप घातलेली दिसत आहे, ज्यामध्ये पूर्ण स्लिव्ह्स, हाय नेक आणि समोरून बो-डीटेल आहे. यासह, तिने एक ब्रॅलेट घातला होता, ज्यामध्ये लो-कट नेकलाइन होती. अभिनेत्रीने टॉपसोबत वाइड लेग पॅंट घातली होती, जी तिचे लांब पाय हायलाइट करताहेत. डायमंड ईयरिंग्स, मेसी हेयर आणि पंप हिल्सनी हा लूक राउंड ऑफ केला आहे.
मुलाला जन्म दिल्यानंतर शेप मध्ये परतलेली अनुष्का शर्मा या फोटोशूटमध्ये तिची फिगर जबरदस्त फ्लॉंट करताना दिसली. या फोटोमध्ये ती काळ्या जाळीचा ड्रेस घातलेला दिसत आहे. फिगर-हगिंग आउटफिटमध्ये समोरून एक स्लिट डिझाइन होती, तर बाजूला फेदर डीटेलिंग जोडले गेले होते. फोटोत अनुष्काचे सौंदर्य खूप सुंदर दिसत आहे.
अनुष्का सर्व प्रकारचे ड्रेसेस कॅरी करण्यात माहिर आहे. तिचा आत्मविश्वास तिच्या फोटोशूटमधूनही दिसून येतो. या फोटोतही शीयर ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. अनुष्काच्या ड्रेसिंगने चाहत्यांची मने जिंकली. म्हणूनच या फोटोशूटचे फोटो व्हायरल झाले आहेत.
यापूर्वी अनुष्काने तिच्या प्रेग्नेंसीदरम्यान फोटोशूट करताना दिसली होती. एका प्रसिद्ध मासिकाच्या कव्हर पेजवर ती दिसली. यातही तिची ग्लॅमरस स्टाइल मनाला भिडणारी होती. या फोटोशूटमधील हे देखील एक फोटो होते, ज्यामध्ये अनुष्का प्लाझो पॅंट, लांब कोट, ब्रॅलेट, चंकी ज्वेलरी आणि लहरी केसांमध्ये तिचे सौंदर्य दाखवताना दिसत आहे.
हे फोटो अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here