पुरुष प्रधान समाज(patriarchal society) समाजामध्ये माहिलांना फक्त घर सांभाळ्ण्यासाठी उपयोगी असल्याचे मानले जाते. कित्येक पुराणमतवादी विचारांच्या लोक मानतात ती, महिलांनी नोकरी नाही केली पाहिजे. रोजच्या जीवनातील काही काम नाही करु शकत फक्त घर चालवू शकतात. अशा लोकांचे तोंड बंद करणारे एस्टोनिया (Estonia Island of Women) हे असे गाव आहे जिथे 90 टक्क्यांपेक्षा जास्त महिलाच राहतात. या आयलँडची विशेषत: ही आहे की येथे बहुतेक महिलाच येथे राहतात ज्या संपूर्ण द्वीपची जबाबदारी सांभळतात.

एस्टोनियातील किहनु आयलँड
एस्टोनिया येथील किहनु आइलँड (Kihnu Island of Women) महिलांचे आयलँड म्हणून प्रसिध्द आहे. आयलँडचे नाव यूनेस्कोच्या इंटँजिबिल कल्चरल हेरिटेज ऑफ ह्यमॅनिटी (UNESCO’s Intangible Cultural Heritage of Humanity) च्या लिस्टमध्ये समाविशष्ट आहे. या आयलँडवर जवळपास 300 लोक राहतात,ज्यामध्ये बहूकेत महिला आहे. तुम्ही विचार करत असाल की इथे फक्त महिलाच का राहतात? पुरूष का नाही? या महिला अविवाहित आहे का? नसतील तर त्यांचे कुटुंब कुठे आहे? चला जाणून घेऊ या प्रश्नांची उत्तर…
हेही वाचा: जगातलं असं गाव जिथं आहेत शाकाहारी लोकं

महिला करतात धार्मिक विधी
या महिलांचे पती आणि कुटंबातील पुरुष एस्टोनियामध्ये नोकरी करण्याच्या उद्देशाने राहतात. त्यामुळे या आयलँडवर बहुतांश महिलाच राहतात. पण महिलांनी पूर्ण द्वीप अशा प्रकारे सांभाळला आहे की सर्वजण त्यांचे कौतुक करतात. हे आपल्या श्रद्धा आणि चालीरीतींचे पालन करण्याचा प्रयत्न करतात. उत्साहाने सण साजरे करतात, नाचतात, गातात आणि पुरुषांनी कमावेल्या पैशांशिवाय शिल्पकारी करून पैसे कमावतात. महिलाच या द्वीपवर लग्न लावतात आणि अंतिम संस्कार देखील करतात
मातृसत्ताक परंपरनुसार निर्माण झालेल्या या आयलँडमधील लोक आपली श्रद्धेमुळे विखुरलेले नाही. रिपोर्ट्स नुसार आयलँडवर क्रिमिनल आणि तडीपाराची शिक्षा दिलेले लोक देखील राहतात. जवळपास 50 वर्ष या आयलँडवर सोव्हिएत संघने कब्जा केला होता. त्यावेळेपासून येथे महिलांचेच वर्चस्व आहे. पण बदलच्या काळानुसार तरुण मुले-मुलींना आयलँडच्या बाहेर जाऊन शिक्षण घेतात आणि नोकरी करण्याची इच्छा असते त्यामुळे आता हळू हळू तेथील ही खास परंपरा संपुष्ठात येत आहे.
Esakal