बॉलीवूडचे चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना गेल्या दोन वर्षांपासून सूर्यवंशीचे वेध लागले होते. वास्तविक हा चित्रपट गेल्या वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता मात्र कोरोनामुळे त्याचे प्रदर्शन पुढील ढकलण्यात आले होते. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

रजनीकांत यांच्या अन्नाथे यांच्या चित्रपटाला तगडे आव्हान या चित्रपटानं दिले आहे.
अक्षय कुमार, रणवीर सिंग, अजय देवगण आणि कॅटरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटामध्ये आहे.
आता अक्षयकुमारनं एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये त्यानं लिहिलं आहे की, एखादा चित्रपट तुमच्या आयुष्यात किती मोलाची भूमिका पार पाडू शकतो याचा प्रत्यय सूर्यवंशीतून आपल्याला आल्याचे त्यानं सांगितलं आहे.
अक्षयच्या सूर्यवंशीनं आतापर्यत 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. नेटफ्लिक्सनं हा चित्रपट विकत घेतला आहे.
पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नेटफ्लिक्सनं 100 कोटींना या चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहे…

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here