नागपूर : समुद्र किनाऱ्यावरच्या भटकंतीची मजा काही औरच असते. समुद्रकिनारा म्हटलं की डोळ्यांसमोर गोवा आणि कोकण येते. गोवा आणि कोकणातले समुद्रकिनारे रम्य आहे. मात्र, आपल्या देशातले अन्य समुद्रकिनारेही स्वच्छ आणि सुंदर आहेत. तुम्ही गोवा आणि कोकणात गेला असाल. परंतु, पुन्हा समुद्रकिनाऱ्यांची सैर करण्याची इच्छा असेल तर या ठिकाणांचा विचार करायला काहीच हरकत नाही.

पुड्डचेरीचा ईडन बीच खूप रेखीव आणि सुंदर आहे. इथल्या समुद्राची निळाई डोळ्यात भरून घेण्यासारखीच
पुरी हे ठिकाण जगन्नाथाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. तसेच पुरीमध्ये सुंदर समुद्रकिनाराही आहे. अत्यंत स्वच्छ आणि सुंदर असा हा समुद्रकिनारा मनात घर करून राहील.
गुजरातमध्ये शिवराजपूर बीच आहे. द्वारकेपासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावरचं हे ठिकाण अनोखं आहे. इथे तुम्हाला डॉल्फिन्सचे दर्शन घडू शकते.
दीवमधला घोघला बीचही प्रसिद्ध आहे. इथली सोनेरी वाळू आणि निळाशार समुद्र पर्यटकांना आकर्षित करतो.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here