जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी नेते होते. ते पंडित नेहरू या नावानेही ओळखले जातात. पंडित नेहरूंना मुले फार आवडत, म्हणून मुले त्यांना चाचा नेहरू म्हणायचे.महात्मा गांधींचे ते राजकीय वारस म्हणून ओळखले जातात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते.‘आयडीया ऑफ इंडिया’ ठरवून स्वतंत्र भारताची पायाभरणी करण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले.सध्या त्यांच्याबाबत चुकीचा इतिहास पसरवून द्वेष पसरवला जातो. मात्र, इतिहासात पंडित नेहरुंचं योगदान वादातीत आहे. महात्मा गांधींच्या अहिंसक आणि सत्याच्या मार्गाने झालेल्या स्वातंत्र्यलढ्याचे ते एक मोठे नायक होते.