दीर्घायुष्याची इच्छा कोणाला नसते? परंतु चुकीच्या जीवनशैलीमुळे व्यक्तीचे आयुष्य कमी होत आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचा आपल्या आयुर्मानावर कसा परिणाम होतो हे अनेक अभ्यासात सिद्ध झाले आहे. जर तुम्ही तुमच्या आहारात सकस पदार्थांचा समावेश केलात, तर तुम्ही नक्कीच चांगले आणि दीर्घ आयुष्य जगू शकाल. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ आणि आरोग्य आणि पोषण तज्ज्ञ डॉ. जेम्स डिनिकोलाँटिनियो यांनी अलीकडेच त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल सांगितले आहे, जे एखाद्या व्यक्तीला १०० वर्षे दीर्घायुष्य देऊ शकतात.

कच्चे मध- कच्च्या मधामध्ये असलेली पोषक तत्व कर्करोग आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करतात. नॅशनल लायब्ररी ऑफ हेल्थमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, यकृत, कोलोरेक्टल आणि स्तनाच्या कर्करोगावर मधाची प्रभाविता दिसून आली आहे. अभ्यासानुसार ट्यूमर आणि कर्करोग यांसारख्या पेशींसाठी मध अत्यंत सायटोटॉक्सिक आहे, तर सामान्य पेशींसाठी नॉन-साइटोटॉक्सिक आहे.
बकरीच्या दुधापासून बनवलेले केफिर- कर्करोग हे जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. तुम्हाला माहित आहे का की शेळीच्या दुधापासून बनवलेल्या केफिरमध्ये असलेले प्रोबायोटिक्स आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास आणि कर्करोगाच्या ट्यूमरच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत करतात. अनेक टेस्ट ट्यूब संशोधनात ही बाब समोर आली आहे. जर्नल ऑफ मेडिसिनल फूडमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, केफिरमुळे मानवांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका ५६ टक्क्यांपर्यंत कमी होतो.

डाळिंब – डाळिंब हे जीवनसत्त्वे- A, C, E आणि अनेक प्रकारच्या खनिजांचा चांगला स्रोत मानला जातो. डाळिंबात अँटी-व्हायरल आणि अँटी-ट्यूमर गुणधर्म देखील आढळतात. नेचर मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, डाळिंबातील माइटोकॉन्ड्रिया स्नायूंना कमकुवत होऊ देत नाही. दुसर्या अभ्यासानुसार, मायटोकॉन्ड्रियाचे बिघडलेले कार्य पार्किन्सनसारख्या वृद्धत्वाच्या आजारांना कारणीभूत ठरू शकते.

केळी
कच्चे केळे- हिरव्या केळ्यामध्ये एक प्रकारचे प्रीबायोटिक असते, जे आपल्या पोटात असलेल्या निरोगी बॅक्टेरियांना अन्न पुरवते. तसेच रक्तदाब कमी ठेवते. अनेक अभ्यासानुसार, हिरवी केळी खाल्ल्याने किडनीच्या कर्करोगाचा धोकाही ५० टक्क्यांनी कमी होतो.
आंबोवले अन्न – आंबवलेले पदार्थ आपला चयापचय दर बदलू शकतात याचे पुरावे उपलब्ध आहेत. याचा अर्थ ते तुमच्या पचनसंस्थेची क्षमता सुधारू शकतात. त्यांच्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स, अँटिऑक्सिडंट आणि प्रतिजैविक गुणधर्म वृद्धत्व आणि दीर्घायुष्याशी संबंधित जोखीम कमी करू शकतात. याशिवाय प्राण्यांची चरबी, बेरी, मशरूम, सॅल्मन फिश आणि अंडी खाल्ल्यानेही व्यक्तीचे आयुष्य वाढू शकते.
Esakal