रक्तातील ग्लुकोज वा साखरेचे प्रमाण जास्त असल्याने, डायबिटीज आपल्या शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवावर विपरित परिणाम करू शकतो. त्याचा परिणाम डोक्यापासून पायापर्यंत होतो. ब्रेन स्ट्रोक होणे ते पाय किंवा पायाचे बोट कापून टाकावे लागते. मधुमेहाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी जागतिक सार्वजनिक आरोग्य केद्राकडून 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. “मधुमेहाच्या काळजीसाठी प्रवेश – आता नाही तर कधी?” ही यावर्षीची थीम आहे.

हेही वाचा: 14 नोव्हेंबरला का साजरा करतात World Diabetes Day?

युएसमध्ये नॅशनल नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डायबिटीज अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजेस या संस्थेने सर्वेक्षण केले. सर्वेक्षणानुसार मधुमेहामुळे तुमच्या डोळ्यांचे नुकसान होऊ शकते. एकतर दृष्टी खराब होते किंवा अंघत्व येऊ शकते. पण जर तुम्ही योग्य काळजी घेतलीत, डाएट पाळलेत तर तुम्ही डोळ्यांचे नुकसान होण्यापासून रोखू शकता. एका राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार भारतात 16.9 टक्के इतका डायबेटिक रेटिनोपॅथीचा प्रादुर्भाव आहे. तर DR म्हणजेच दृष्टीला धोका निर्माण होण्याचा प्रसार 3.6 टक्के आहे. त्यामुळे डायबिटीस असलेल्यांनी नियमित डोळ्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. नेत्ररोग तज्ज्ञाकडे जाऊन रेटिनोपॅथी आहे का आणि असल्यास त्यावर उपचार करून घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा: World Diabetes Day 2021 : ब्लड प्रेशरची औषध मधुमेहासाठी फायदेशीर; संशोधनाचा निष्कर्ष

मधुमेह

मधुमेह

अशी ओळखा लक्षणे

अस्पष्ट दिसणे हे मधुमेह असलेल्या लोकांमध्ये सतत उद्भवणाऱ्या समस्यांपैकी एक असल्याचे या विषयातील तज्ज्ञ डॉक्ट सांगतात. मानवी शरीरात रक्तातील ग्लुकोजच्या उच्च पातळीमुळे आपल्या डोळ्यांच्या लेन्स भरपूर द्रव खेचतात. त्यामुळे आपल्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.  तुमच्या रेटिनामध्ये डायबिटीजमुळे नवीन रक्तवाहिन्या तयार होऊ शकतात. जर नवीन रक्तवाहिन्या डोळ्यांमधून द्रवपदार्थावाटे अडथळा आणत असतील, तर डोळ्यामध्ये दाब निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळ्यांच्या मज्जातंतूला इजा होऊ शकते. रक्तात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने काचबिंदू होण्याची शक्यताही बळावते.मात्र यासाठी उपचार आवश्यक आहेत. जर योग्च उपचार घेतले नाहीत तर कायमचे अंघत्व येण्याची किंवा दृष्टी कमी होण्याची शक्यता असते, असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले. तर, दृष्टीमध्ये काळे ठिपके दिसणे, दृष्टीत चढ-उतार होणे, दृष्टीमध्ये गडद किंवा रिकामी जागा अशी काही लक्षणे असू शकतात.

हेही वाचा: World Diabetes Day : तुमच्या मुलाला डायबिटीज होईल याची भीती वाटतेय, अशी घ्या काळजी

यावर उपाय काय?

युएसमध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार डोळे निरोगी ठेवणे महत्वाचे आहे. त्यासाठी वर्षातून एकदा, गरज पडल्यास दोनदा डोळ्यांची डायलेटेड तपासणी करून घ्या. तसेच रक्तातील ग्लुकोज, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल व्यवस्थित असेल याची काळजी घ्या. जर तुम्ही सिगरेट ओढत असाल,. तर ती सोडणेही गरजेचे आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here