यावेळी रविवारी बालदिन आला आहे. मुलांबरोबर त्यांच्या आईवडिलांनाही सुट्टी आहे. त्यामुळे त्यंचा बालदिन हटके आणि अविस्मरणीय करण्यासाठी पालकांची तयारी झाली असेल.

मुलांना या दिवशी तुम्ही काही वेगळी गिफ्ट देऊ शकता. त्यामुळे त्यांच्या ज्ञानातही भर पडेल, नवा अनुभव मिळेल.
पुस्तक द्या- वाचनाने माणसाचे ज्ञान समृद्ध होते. नवीन शब्दभांडार मिळते. त्यामुळे इंग्रजी-मराठी पुस्तकांची गोडी लावण्यासाठी मुलांना पुस्तके गिफ्ट करा.
स्वयंपाकात मदतीला घ्या- सकाळी जर तुम्ही मुलांना धेऊन त्यांच्या आवडीचा पदार्थ केला नसेल तर आज संध्याकाळी करा. त्यांना स्वयंपाकधरात काम कसं चालतं याविषयी माहिती मिळेल.
कोलाज गिफ्ट करा- त्यांच्या लहानपणापासून आतापर्यंतचे फोटो कोलाज करून त्यांना गिफ्ट करू शकता. हे कोलाज मोठेपणी पाहून त्यांना नक्कीच आनंद होईल.
बागकाम शिकवा- झाडे लावल्याने निसर्गाला कसा फायदा होतो, ते सांगून एखादे रोप लावा. बागकाम कसे अशते याची ओळख या निमित्ताने होईल.
छंदानुसार गिफ्ट द्या- मुलांच्या आवडीचा छंंद ओळखून त्यांना त्याप्रमाणे गिफ्ट द्या. मुलांना चित्रकला, संगीताची आवड असेल तर त्याप्रमाणे गोष्टी दिल्यास त्यांना अधिक आनंद होईल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here