ही गोष्ट आहे केरळमधील शाहिना हिची. ती आहे ३४ वर्षांची. एर्नाकुलममधील इडापल्ली येथील ती रहिवाशी आहे. एका अपघाताने तिच्या पूर्ण आयुष्यच बदलवले.

(फोटो क्रेडिट – विष्णू संतोष)

पाच वर्षांची असताना एक दुर्घटना घडली. टेबलाजवळ बसून अभ्यास करत होते. राॅकेलचा दिवा टेबलवर होता. अनावधानाने मी दिव्याला हाताने धक्का दिला. मात्र दुर्देवाने माझ्या कपड्याला आग लागली.
यात मी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त जळाले. माझ्या वडिलांचे नाव सीए कंजु मोहम्मद, तर माझ्या आईचे नाव सुहारा. मला तीन बहिणी आहेत. त्या तिघांचाही विवाह झाला आहे. मी कधीही डाॅक्टर होण्यासाठी अभ्यास केला नव्हता. वास्तविक मला अभियांत्रिकी क्षेत्रात रस होते.
मात्र मला प्रवेश मिळाला औषधीशास्त्रात. वैद्यकीय समुपदेशनात माझ्यासमोर पहिला पर्याय एमबीबीएस होते. मात्र मी वैद्यकीय मंडळाच्या निर्णयानुसार मी पात्र नव्हते. म्हणून माझी बीएचएमएससाठी डाॅ. पाडिअर मेमोरियल होमोपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय, चिट्टानिक्करामध्ये निवड झाली.
वैद्यकीय शाखेची विद्यार्थिनी बनल्याने मला आयुष्यात दुसऱ्यांदा संधी मिळत होती. होमोपॅथिक डाॅक्टर झाल्यानंतर मी माझे भविष्य नव्याने लिहिले. विचार केला की देवाने मला इतरांची सेवा करण्यासाठी संधी दिली आहे.
मला वाटते, की लोकांनी त्यांच्या संकटाच्या काळात उभे राहून संधी शोधली पाहिजे. जेव्हा जीवनात गोष्टी चांगल्या घडत नसतील तेव्हा धाडस आणि कधीही हार मानू नये.
आत्मविश्वास हा सर्व यशाचा पाया आहे. स्वतःचे व्हा, इतरांना प्रेरित करा.
दुर्घटनेनंतर जवळपास एक वर्ष माझ्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया होत होत्या. सर्व उपचार हे कोट्टायम येथील वैद्यकीय महाविद्यालयात सुरु होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here