बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. साराला तिच्या सुट्ट्या इंजॉय करायला फार आवडतं. कधी आई अमृता सिंगसोबत, कधी भाऊ इब्राहिम अली खानसोबत तर कधी आपल्या ‘गर्ल गँग’सोबत ती व्हेकेशन एन्जॉय करायला ती पसंती देते. यादरम्यान सारा खूप मस्ती करताना दिसते.

नुकतीच सारा तिच्या फ्रेंड सर्कलसोबत मालदीवच्या सहलीवर गेली आहे. तेथील अनेक फोटो आणि व्हिडिओ तिने शेअर केले आहेत.
सारा अली खानने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती मल्टी-कलर बिकिनी घालून स्विमिंग पूलच्या बाजूला पोज देताना दिसत आहे. यासोबतच साराने तिच्या मैत्रिणींसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. तसेच एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये सूर्यास्त दिसत आहे.
फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना सारा अली खानने लिहिले आहे की, “डोक्यावर आकाश आणि पायाखाली वाळू, आजूबाजूला निळाशार समुद्र…मला या प्रवाहासोबत पुढे जायचे आहे.
सारा अली खानसाठी मालदीव हे मनोरंजनासाठीचे आवडते ठिकाण बनल्याचे दिसते. साराला प्रवास करायला आवडते आणि ती तिच्या चाहत्यांना सहलीची माहिती देण्यास विसरत नाही.
कामाच्या बाबतीत सारा अली खान अलीकडेच वरुण धवनसोबत ‘कुली नंबर 1’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. याशिवाय ती आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटातही झळकणार आहे.
या चित्रपटात ती अक्षय कुमार आणि धनुषसोबत काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग आता संपले आहे. सध्या तरी साराचा कोणताही प्रोजेक्ट नाहीये.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here