सध्या वेगन फूड, वेगन डाएट करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे वेगन विषयी अनेकांना आपुलकी वाढली आहे. त्यात आता वेगन कंडोमची भर पडली आहे. हे कंडोम दिल्लीतल्या अरुणा चावला यांनी बाजारात आणले आहे. शारीरिक संबंधांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने कंडोमचे महत्त्व असायला हवे असे अरुणा यांचे म्हणणे आहे.
एड्सचा धोका, कोरोना काळात नको असताना गर्भधारणा झालेल्या महिलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कंडोम वापरणाऱ्यांची संख्या वाढते आहे. भारतात कंडोम गांभीर्यांने वापरण्याकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नाही. आरोग्याचा विचार करता दिल्लीतील अरूणा चावला यांनी संशोधन करून हे वेगन कंडोम बाजारात आणले आहे. यासंदर्भात द बेटर इंडिया ला अरूणा यांनी मुलाखत दिली आहे.
अरूणा यांनी या विषयावर दोन महिने संशोधन केले. यावेळी सामाजिकदृष्ट्या कंडोमला मान्यता नसल्याचे त्यांना आढळले. दिल्ली, मुंबई अशा शहरांमध्ये कंडोम घेताना कुणी पाहिले तर अशी भितीच जास्त असते. इंटरनॅशनल सेंटर फॉर रिसर्चने केलेल्या अभ्यासानुसार, गर्भनिरोधक विषयाचा जास्त ताण हा महिलांवर येतो अनेक कुटुंबांमध्ये पुरुष कुटुंबनियोजनाच्या बाबतीत म्हणावा तितका गंभीर नसतो.
हेही वाचा: UNISEX CONDOM : मलेशियन स्त्रीरोग तज्ज्ञांनी बनवलं जगातलं पहिलं युनिसेक्स कंडोम

अशी केली सुरूवात- अरुणा यांनी कंडोमची निर्मिती करण्याच्या दृष्टीने देशभरात दौरा केला. अभ्यासानंतर जून २०२० साली सलाड नावाने वेगन कंडोम स्टार्ट अप सुरू केले. यामध्ये बिनविषारी आणि इको कॉन्शस कंडोम तयार केले जातात. यामध्ये वापरण्यात आलेले नैसर्गिक लॅटेक्स हा पदार्थ सुगंधमुक्त असतो तसेच त्याचे पॅकेजिंग पुर्नवापर करण्यायोग्य बनवलेले आहे.
सलाड वेगन कंडोम असे आहेत?- भारतात शाकाहारी लोकांचे प्रमाण जास्त आहे. केवळ मार्केटींग किंवा लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही वेगन असे म्हणत नसून आम्ही खऱ्या अर्थाने त्या पद्धतीचे पदार्थ हा कंडोम तयार करण्यासाठी वापरल्याचे अरुणा यांनी सांगितले.
क्यू आर कोडमधून मिळणार घटकांची माहिती- कंडोममध्ये असणाऱ्या घटकांविषयी कोणतीही माहिती नसते. त्यामुळे या कंडोममध्ये नेमके कोणते घटक आहेत हे समजून घेण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन केल्यावर ग्राहकांना कंडोममध्ये वापरण्यात आलेले घटक, त्यांचे शरीराला होणारे फायदे याविषयी माहिती दिली आहे. अनेकदा कंडोममध्ये प्लास्टीकसारखा घटक किंवा प्राण्यांशी निगडीत पदार्थांचा वापर केलेला असतो.
Esakal