संयुक्त सातारा जिल्ह्यात सांगलीची ओळख दक्षिण सातारा जिल्हा अशी होती. द्विभाषिकातून स्वतंत्र महाराष्ट्र स्थापना होण्यापुर्वी ३० नोव्हेंबर १९५७ रोजी प्रतापगडावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी पंडितजी आले होते. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा मोठा जोर होता. पंडितजींना काळे झेंडे दाखवण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यानी संपुर्ण प्रतापगड ताब्यात घेतला होता. पंडितजींच्या या दुर्मिळ छायाचित्रांचे सौजन्य आहे, सांगलीच्या ‘देवळेकर यांच्या संग्रहित छायाचित्रांतून’…

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सांगली जिल्ह्यात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर अशा दोन वेळा आले होते.
१९६२ मध्ये लोकसभा निवडणूक प्रचारासाठी आणि १९३७ मध्ये मिरजेत नातलगांच्या वैद्यकीय उपचारासाठी ते आले होते.
सांगलीतील स्टेशन चौकातीगांधी पुतळ्याचीही त्यांनी पाहणी करुन कौतुकाची थाप दिली होती.
विश्रामबाग येथील राजेसाहेबांच्या गेस्ट हाऊसमध्ये चहा-पाण्यासाठी ते आले होते. पंडितजीच्या स्मृती आम्ही आजही जपल्या आहेत.
सांगलीच्या स्टेशन चौकात उभ्या केलेल्या त्यांच्या पुतळ्याचे मुळ कास्टींग मॉडेल आमच्या शाळेच्या सभागृहात आम्ही जपून ठेवले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here