काहीवेळा आपण कोणतीही जड काम किंवा क्रिया करत नसतानाही आपल्याला थकवा जाणवतो. आपली ऊर्जा आणि उत्साह कमी झाल्याचं दिसून येते. यादरम्यान आपण घेतो. विश्रांतीमुळे शरीराला आराम मिळतो आणि या आळसातून मुक्त होण्यास मदत होते, परंतु आपण जर आहाराच्या बाबतीत जर जागरूक असू तर आपल्या शरिराची रिकव्हरी वेगात होऊ शकते. म्हणूनच ऊर्जा पुनर्संचयित करण्यात मदत करणारे आणि दिवसभर उत्साही ठेवणारे पदार्थ समाविष्ट करणे देखील महत्त्वाचे आहे.

हेही वाचा: प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बनवलं सुंदर घरं; विश्वास बसत नाही? पाहा फोटो

नेमकं हेच सांगत आहेत, पोषणतज्ञ शोनाली सभेरवाल…शोनाली यांनी काही खाद्यपदार्थांची शिफारस केली आहे, ज्यांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. इन्स्टाग्रामवर एका पोस्टमध्ये त्या म्हणतात की, “ थकवा आणि उर्जेच्या पातळीबद्दल खूप मला अनेक तक्रारी ऐकायला मिळतात. तुम्हालाही थकवा किंवा आळस वाटत असल्यास तुम्ही ही पोस्ट जरूर वाचा.”

सर्व धान्ये, सोयाबीन, राजमा, चणे आणि मसूर हे सर्व फायबरने समृद्ध आहेत, जे इन्सुलिनचे उत्सर्जन कमी करतात आणि उर्जेचा स्थिर पुरवठा राखण्यास मदत करतात.

हेही वाचा: साराचा बोल्ड लूक; ‘गर्ल गँग’सोबत मालदीवमध्ये करतेये एन्जॉय

विविध प्रकारची ताजी फळे आणि भाज्या खा. त्यांच्यातील संरक्षणात्मक फायटोकेमिकल्स आणि सूक्ष्म पोषक घटक चयापचय क्रियेसाठी आवश्यक आहेत

  • बरोबर नाश्ता प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि योग्य फॅटयुक्त सकस स्नॅक्स निवडा. स्नॅक्सच्या चांगल्या पर्यायांमध्ये न खारवलेले मूठभर काजू, ताजा सुकामेवा, हुमस असलेल्या भाज्यांचा समावेश होतो.

  • सतत काही ना काही खात राहा : “जास्त जेवण शरीराला जास्त इंसुलिन सोडण्यास प्रवृत्त करू शकते, परिणामी रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि थकवा येतो, त्यामुळे ऊर्जा कमी होते. दिवसभर पुरेसे जेवण किंवा सकस स्नॅक्स खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होते,” असं सभेरवाल म्हणाल्या.

  • हायड्रेटेड रहा- निर्जलीकरण हे थकवा येण्याचे सामान्य कारण आहे. दिवसभर पाणी किंवा ज्यूसरारखे हेल्थी द्रवपदार्थ प्यायला हवेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here