NZ vs AUS, T20 World Cup Final: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये यंदाच्या टी२० विश्वविजेतेपदाची लढत रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा तर न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव करत फायनल गाठली आहे. त्यामुळे या दोन संघांमध्ये आज चुरशीचा सामना होणार यात वादच नाही. या दोन संघांनी आतापर्यंत एकूण १४ सामने खेळले असून त्यातील ९ सामने ऑस्ट्रेलियाच्या खात्यात जमा आहेत. पण टी२० विश्वचषकाच्या इतिहासात मात्र न्यूझीलंडने एकमेव सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारलेली आहे. अशा परिस्थितीत आजच्या सामन्याचा आणि यंदाचा टी२० विश्वविजेता कोण होणार? याबद्दल लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी सूचक विधान केलं आहे.

हेही वाचा: NZ vs AUS Final: कोण ठरेल वरचढ? पाहा आकडेवारी काय सांगते…

“तुम्ही हारण्यापेक्षाही जास्त वेळा जिंकलेले असता त्यावेळी तुम्ही कोणत्याही सामन्यात पूर्ण आत्मविश्वासाने उतरता. सामन्यात काहीही घडू देत, कितीही दडपणाची परिस्थिती येऊदे, आपण जिंकायचंच अशी त्या संघाची मानसिकता असते. मग असा संघ कोणत्याही परिस्थितीतून विजयश्री खेचून आणण्यास सक्षम ठरतो. सध्या तो संघ म्हणजे ऑस्ट्रेलियाचा संघ असं मला वाटतं. त्यांना गेल्या काही सामन्यांमध्ये गती आणि लय प्राप्त झाली आहे. त्याचा वापर ते नक्कीच अंतिम सामन्यात करतील”, असं सूचक वक्तव्य गावसकर यांनी व्यक्त केलं.

NZ वि AUS फायनल

NZ वि AUS फायनल

हेही वाचा: AUS vs NZ: मास्टर ब्लास्टर सचिननं किवींना केलं सावध; म्हणाला…

बाद फेरीतील सामन्यांचा इतिहास पाहता ऑस्ट्रेलियाचा संघ न्यूझीलंडपेक्षा वरचढ आहे. ऑस्ट्रेलियाने बाद फेरीच्या सामन्यांमध्ये केवळ न्यूझीलंडच नव्हे तर विविध संघांना धूळ चारली आहे. ऑस्ट्रेलियाची बाद फेरीतील कामगिरी अतिशय उत्तम आहे. त्यामुळे आपलं पहिलं टी२० विश्वविजेतेपद मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वस्व पणाला लावेल हे नक्की”, असं मतंही सुनील गावसकर यांनी मांडलं.

गावस्कर

गावस्कर

हेही वाचा: IND vs NZ: “हा विराटने रोहितचा केलेला अपमान”; गावसकर भडकले…

दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दोन्ही संघांनी विरोधी गटात गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या संघांना पराभूत करून फायनलचं तिकीट मिळवलं आहे. त्यामुळे दोन्ही संघ विश्वविजेतेपद जिंकण्यासाठी जमेल ते सारं काही करतील, यात वाद नाही.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here