इगतपुरी (जि. नाशिक) : नाशिक मुंबई महामार्गावर शनिवारी (ता.१३) सायंकाळी कंटेनरचे ब्रेक नादुरुस्त होऊन विचित्र अपघातात कंटेनरने तीन वाहनांना जोरदार धडक दिली. यात कंटेनर चालकाने जीव वाचवण्याच्या नादात ८० फूट दरीत उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना कसारा फाट्यालगत घडली. यामुळे महामार्गावर एक तास वाहतूक कोंडी झाली होती.

नाशिकहून मुंबईकडे जाणारा कंटेनर (एम.एच ४६, एच ः१०२५) हा कंटेनर कसारा घाट उतरून आल्यानंतर पुढे भरधाव येत होता. कंटेनरने कसारा फाट्यालगतचे नागमोडी वळण पार केल्यानंतर तो आहे त्या वेगात मुंबईच्या दिशेने जात असता अचानक कंटेनरमध्ये तांत्रिक बिघड झाला. गाडी चालकास गाडी नियंत्रणात येत नव्हती. कंटेनर पुढे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बंधारा पुलावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पिंक इन्फ्रा या ठेकेदाराचे गेल्या चार महिन्यापासून काम सुरू असल्याने एकेरी मार्ग सुरू होता, त्यामुळे अर्धा रस्ता बंद होता. परिणामी तांत्रिक बिघड झालेला कंटेनर नियंत्रणात येत नसल्याने कंटेनर चालकाने स्कॉर्पिओ (एम एच ०४ एफ आर ८०९१), फोर्ड फिगो ( एमएच १५ इपी २३२५) व ट्रक ( एमएच १९, बी यू २५५०) या तीन वाहनांना जोरदार धडक दिली आणि पुढे पुलावर गाडी बंद पडली.

हेही वाचा: ‘आदिवासी हा देशाचा मूळ मालक, तो नक्षली विचार करणार नाही’

भीतीपोटी उडी मारली अन् जिवानीशी गेला

अपघात केल्याच्या भीतीपोटी कंटेनरचालक विशाल यादव ( वय २५) याने स्वतःच्या बचावासाठी पुलावरून उडी मारली, मात्र पुलाखाली दरी असेल हे लक्षात न आल्याने कंटेनरचालक पुलावरून थेट ८० फूट खाली दरीतील दगडावर जाऊन आपटला, त्यातच त्याचा मृत्यू झाला.

महामार्गावर एक तास वाहतूक कोंडी झाली होती.

महामार्गावर एक तास वाहतूक कोंडी झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पथकाचे सदस्य शाम धुमाळ, दत्ता वाताडे, सनी चिले, लक्षमण वाघ, आकाश यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. कसारा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गणेश माळी कर्मचाऱ्यासह घटनास्थळी हजर झाले. वाहतूक कोंडी दूर करीत अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक एक तास विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिस शहापूर केंद्राचे कर्मचारींनी वाहतूक पूर्ववत सुरु केली.

हेही वाचा: लोंबकळणाऱ्या वीजतारांमुळे शेतकऱ्यांचे जीव टांगणीला

मोठा अनर्थ टळला…

ब्रेक नादुरस्त झालेला कंटेनर अपघातात तीन वाहनांचे नुकसान झाले असले तरी कोणालाही मोठी दुखापत झाली नाही, परंतु जर हा भरधाव कंटेनर थांबला नसता तर अजून कित्येक गाड्यांना धडक देऊन मोठा अनर्थ घडला असता,मात्र सुदैवाने तो टळला.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here