बाबासाहेब हे त्यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र लेखन केले. त्याला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. केवळ महाराष्ट्रातच नाहीतर देशाच्या कानाकोपऱ्यात बाबासाहेब यांचे चाहते आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात बाबासाहेब आणि त्यांनी लिहिलेले शिवचरित्र यांची नेहमीच चर्चा होत असते. लहानांपासून ज्येष्ठांपर्यत सर्वांनीच त्यांच्या शिवचरित्राचे पारायण केले असल्याचे दिसून आले आहे. बाबासाहेब यांनी सुरुवातीला शिवव्याख्याते म्हणून सुरुवात केली होती. त्यांच्या शिवचरित्राला अवघ्या महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला.

अखेर वृद्धापकाळानं बाबासाहेबांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांचं जाणं साऱ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनाला चटका लावून गेलं आहे.
बाबासाहेबांनी हयातभर शिवचरित्राचा ध्यास घेतला होता. शिवचरित्र सांगणं, ते लिहिणं आणि राजा शिवछत्रपतींचे विचार सगळ्यांपर्यत पोहचवण्याचे काम बाबासाहेबांनी केले.
या कामासाठी त्यांना राज्यातील जनतेनं मोठा प्रतिसाद दिला. बाबासाहेबांनी राज्यासह देशातील अनेक किल्ल्यांवर भटकंती केली होती.
काही झालं तरी शिवाजी राजांचे विचार सर्व सामान्यांपर्यत जायला हवेत या भावनेनं त्यांनी साहित्याच्या आधारातून जनजागृती केली.
त्यांनी शिवाजी महाराजांवर आधारित भव्य अशा राजा शिवछत्रपती नाटकाची निर्मितीही केली होती. त्यालाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद दिला होता.
बाबासाहेब यांना वेगवेगळ्य़ा पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले होते. त्यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आले होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here