मुलींना इम्प्रेस करणं सोपं आहे, असं बऱ्याच मुलांना वाटत. पण आजकाच्या मुली स्मार्ट आणि हुशार आहेत. त्यांना फक्त मुलांचे दिसणे आणि पैसा या गोष्टींपेक्षा त्याच्या सवयी काय आहेत हे कळणे जास्त गरजेचे वाटते. त्यासाठी त्या तुम्हाला व्यवस्थित पारखून घेतात. मगच त्या व्यक्तीला जोडीदार बनवायचे का नाही हे ठरवितात.
खरंतर मुलींना आयुष्यात सिक्युरिटी अर्थातच सुरक्षिततात हवी असते. अशा परिस्थितीत समोरच्याचे वागणे कसे आहे, यावर पैशांपेक्षा जास्त गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे तुमच्या वागण्याच्या सवयींवरून तुम्ही तिच्यासाठी मिस्टर परफेक्शनिस्ट आहात का ते मुली ठरवतात. मुली साधारणपणे या गोष्टी बघतात.


खूप गोड बोलणारी मुले मुलींना आवडत नाहीत. गोड गोड बोलताना जर तुम्ही योग्य आणि खऱ्या गोष्टी सांगितल्यास तर त्यावर मुलींचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे मुलांनी स्वतःची जास्त स्तुती करणे टाळले पाहिजे. तसेच अनेक मुलांना शिवी देत बोलण्याची सवय असते. मुलींना ही सवय अजिबात आवडत नाही.

मुलींशी बोलताना तुम्ही कमी बोला, तिला जास्त बोलू द्या. तिचे अधिक ऐका. तिला काय आवडते, कधी राग येऊ शकतो हे जाणून घ्या. तिला तुम्ही तिच्या मागेमागे करणार असाल तर तेही आवडणार नाही. त्यामुळे गंभीरपणे पण प्रवाही तिच्याशी संवाद साधा.


दिसायला चांगली असलेली मुलं मुलींना आवडतात. त्याव्यतिरिक्त मुली या मुलांचे हसणे, डोळे आणि शरीरयष्टीवरही विशेष लक्ष देता. तुमचा फॅशन सेन्स आणि ज्ञान मुलींना नक्कीच इंप्रेस करेल. मात्र त्यासाठी पुरेशी तयारी ठेवा.

जी मुलं आयुष्यात काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न पाहतात, त्यासाठी ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करतात, अशी मुले मुलींना आवडतात. मुलींची स्वतःची काही स्वप्ने असतात त्या अशा मुलांकडे सहज आकर्षित होतात.
Esakal