मुंबई – राजा शिवछत्रपती या ग्रंथातून महाराष्ट्रातल्या घराघरात पोहचलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांचं आज सकाळी वृध्दापकाळानं निधन झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यांना गेल्या आठवडाभरापासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनानं सांगितलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित साहित्याची निर्मिती बाबासाहेबांनी केली होती. त्याला राज्यातल्या वाचकांनी, बाबासाहेबांच्या चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला होता.








Esakal