सातारा : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare) यांचं आज पुण्यात निधन झालं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 100 वर्षांचे होते. बाबासाहेबांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरलीय. शिवशाहीर पुरंदरेंच्या निधनानंतर महाराष्ट्रासह देशभरातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांना अदारांजली वाहिलीय.

हेही वाचा: घराघरात शिवचरित्र पोहचविणारे बाबासाहेब… उदयनराजेंचे दु:ख व्यक्त

खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी बाबासाहेबांना अदारांजली वाहताना त्यांचे काळाच्या पडद्याआड जाणं मनाला चटका लावणारं आहे, असं सांगत ते पुढे म्हणाले, सातारच्या छत्रपती घराण्याशी बाबासाहेबांचा वेगळाच ऋणानुबंध होता. ‘शिवशाहीर’ ही पदवी आमच्या आजी (कै.) राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले (Sumitraraje Bhosale) यांनीच त्यांना साताऱ्यात सन्मानानं बहाल केली होती, अशी आठवण त्यांनी सांगितली.

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेबांचं ‘महानाट्य’ सातारकरांनी आजही ठेवलंय जपून

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना केंद्रबिंदू मानून संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांनी वेचलंय. बाबासाहेबांच्या नसानसात, त्यांच्या रक्तात छ. शिवाजी महाराज होते. आता आपण पाहतो, सध्या सोशल मीडिया झपाट्यानं वाढलाय, पण या आधी सोशल मीडियाचं साम्राज्य इतकं नव्हतं, त्यावेळी बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ‘जाणता राजा’च्या माध्यमातून घराघरांत पोहोचवलं. त्यांच्या अशा जाण्यानं राज्याची मोठी हानी झालीय. तसेच बाबासाहेबांच्या संकल्पनेतून साकारत होत असलेल्या शिवसृष्टीची (Shivsrushti) निर्मिती लवकरात-लवकर व्हावी, यासाठी मी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. त्यांची शिवसृष्टीची इच्छा लवकर पूर्ण होऊन त्याला जास्तीत-जास्त निधी मिळावा, यासाठी माझा प्रयत्न असणार असल्याची भावना उदयनराजेंनी माध्यमांसमोर व्यक्त केली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here