गेल्या काही महिन्यांपासून प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. हा चित्रपट 3D अॅक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा असून याची निर्मिती भूषण कुमार यांनी केली आहे. आदिपुरुष या चित्रपटाची शूटिंग मुंबईतील फिल्मसिटीमध्ये झाली आहे. या चित्रपटाचं प्री-प्रॉडक्शन हे तब्बल ३ ते ४ वर्ष चालू होतं. यातील तांत्रिक बाबींसाठी टीमने खूप मेहनत केली आहे. चित्रपटात प्रभास आणि क्रिती हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेच. सोबतच चित्रपटात काही मराठमोळे चेहरेदेखील झळकणार आहे. त्यातीलच एक म्हणजे अभिनेता रुपेश जाधव. ‘आदिपुरुष’मझ्ये रुपेश हा मध्यवर्ती भूमिकेत आहे.
‘ई सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत रुपेशने त्याच्या शूटिंगचा अनुभव सांगितला. २०२० मध्ये रुपेशने या चित्रपटासाठी पाच ते सहा टप्प्यात ऑडिशन दिलं. निर्माते-दिग्दर्शकांच्या काही अटींमुळे तो त्याच्या भूमिकेविषयी अधिक माहिती देऊ शकला नाही. मात्र सेटवरील एकंदर वातावरण आणि इतर कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, याविषयी तो मोकळेपणे बोलला.
प्रभास आणि ओम राऊत यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव
“प्रभाससोबतचा अनुभव एकंदरित खूप छान होता. अगदी कमी दिवसात त्याच्यासोबत माझी मैत्री झाली. एवढा मोठा कलाकार असूनही त्याने कधीच माज दाखवला नाही. एवढी प्रसिद्धी मिळूनही तो स्वभावाने अत्यंत विनम्र अभिनेता आहे. मी बॉलिवूडमध्ये ओम राऊतच्या चित्रपटातून पदार्पण करत आहे याचा मला खूप आनंद आहे. राऊत हे त्यांच्या कामाच्या बाबतीत एकदम सतर्क असतात, तसेच ते त्यांच्या कलाकारांना त्यांच्या पद्धतीने काम करण्यास वाव देतात. त्यांच्यासोबत काम करुन खूप काही नविन गोष्टी शिकायला मिळाल्या, या सगळ्या कलाकारांबरोबरचा अनुभव खरंच खूप छान होता” असं रुपेश म्हणाला.

रुपेश जाधव
हेही वाचा: “..तेव्हा हिंदू खलनायक का खटकले नाहीत?”; रोहित शेट्टीचा सवाल
रुपेश जाधवचा बॉलिवूडपर्यंतचा प्रवास
रुपेशचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट असून ‘आदिपुरुष’मध्ये तो प्रभाससह अॅक्शन करताना दिसणार आहे. त्याने त्याच्या अभिनयाची सुरुवात पुण्याच्या दिशा चित्रा पुणे ग्रुपमधून केली. नंतर त्याने अनेक एक पात्री, एकांकीका, दिर्घांक, दोन अंकी,तीन अंकी मराठी आणि हिंदी नाटकात काम केलं. यासाठी त्याला अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. रुपेशने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रझाकार या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.
Esakal