अनेक पुरूषांना दाढी ठेवणे आवडते. तो लूक त्यांना अतिशय चांगला दिसत असल्याने मुलीही अशा दाढीवाल्या मुलांच्या प्रेमात असतात. म्हणजेच दाढीत आकर्षक दिसणारे पुरूष मुलींना आवडतात. मात्र दाढी नुसतीच वाढवून उपयोग नाही ती चांगली मेंटेन करणे गरजेचे आहे. दाढीची काळजी घेतली नाही तर ती तुमचा लूक बिधडवू शकते. त्यामुळे दाढी चांगली वाढण्याबरोबरच चेहऱ्याला चांगल्या प्रकारे सूट होण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा: पहिल्यांदाच बिकीनी व्हॅक्स करताय? मग ही बातमी वाचा

योग्य शेप ठरवा- जेव्हा तुम्हाला वाटेल की दाढी वाढवायला हवी तेव्हा सर्वात आधी त्या दाढीचा शेप काय असेल ते निश्चित करा. शिवाय दाढीची ग्रोथ किती करायची हेही ठरवा. त्यामुळे पुढे दाढी मेंटेन करणे सोपे जाईल.

दाढी नियमित दाढी- सकाळी आंघोळीनंतर व रात्री झोपण्याआधी दाढी दोनवेळा विंचरणे आवश्यक आहे. असे केल्याने दाढी चांगली ग्रुम होईल.

नारळाचे तेल लावा- जर तुमची दाढी रुक्ष असेल वा तुम्हाला खाज येत असेल तर तुम्ही नारळ तेलाने दाढीची मालिश केली पाहिजे. असे केल्याने तुम्हाला खाज येणार नाही आणि दाढीचे केस घनदाट होतील.दाढीचे केस स्मूद आणि सॉफ्ट राहावेत यासाठी दाढीला नैसर्गिक पणे कोरडे होऊ द्यावे. ब्लो ड्रायरचा वापर सहसा करू नका.

बिअर्ड ऑईल वापरा- दाढीचे केस चांगले राहावेत यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन बिअर्ड ऑइल वापरा. हे तेल वापरल्याने दाढी निरोगी तर राहतेच शिवाय वाढतेही चांगली.

हेही वाचा: पुन्हा लग्न करण्यासाठी साईट्सची मदत घेताय? या टिप्स फॉलो करा

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here