प्रदूषण
sakal_logo

द्वारे

मिलिंद तांबे

मुंबई : पावसाळा संपल्यानंतर प्रदूषणाची पातळी (pollution level) वाढू लागली आहे. मुंबईतील कधी उष्ण तर कधी थंड वातावरणामुळे (climate changing) आरोग्याच्या तक्रारी (health problems) वाढल्या आहेत. ताप, सर्दी आणि खोकल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या पंधरवड्यापासून मुंबईतील प्रदूषणाची पातळी वर-खाली होत आहे. मुंबईतील प्रदूषणाची पातळी वाईट (pollution in Mumbai) स्तरावर पोहोचल्याची नोंद अनेकदा झाली आहे. त्यातच पहाटे प्रचंड धुकं आणि दिवसा कडक ऊन अशी वातावरणीय स्थिती दिसते. यामुळे वातावरण खराब झाले असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

हेही वाचा: सॅम डिसुझा मुंबई SIT समोर हजर, अन्…

सध्या मुंबईकरांमध्ये गळ्यात खवखव,घसा दुखणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. त्यासह सर्दी , शिंका येण्याचा त्रास देखील अनेकांना जाणवत आहे. हलका ताप तसेच अंगदुखी आणि डोके दुखण्याच्या समस्याच वाढल्या असल्याचे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.मोहन जोशी यांनी सांगितले. वाढते प्रदूषण आणि वतावरणातील बदला हा परिणाम असल्याचे ही त्यांनी पुढे सांगितले.

मुंबईत आरोग्याविषयी तक्रारी वाढल्याने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून रुग्णालयाच्या ओपीडी मध्ये येणाऱ्या रुग्णांमध्ये 20 ते 22 टक्के वाढ झाल्याचे ही डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. अंग दुःखी,घसा खवखवणे, शिंका,ताप ही लक्षणे असून ती जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन तपासून घ्या असा सल्ला ही जोशी यांनी दिला.

कोरोना आणि व्हायरल फिवरची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाऊ नये. मात्र कोणताही ताप,सर्दी, खोकला जाणवत असेल तर अंगावर काढू नका. ताबडतोब आपल्या जवळच्या रुग्णालयात किंवा आरोग्य केंद्रांवर जाऊन तपासणी करून घ्या. पालिकेकडून आरोग्य चाचण्यांची व्यवस्था केली असल्याचे ही डॉ.मोहन जोशी यांनी सांगितले.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here