
5 तासांपूर्वी
‘आधी तुरुंगातलं जेवण घ्या…’ न्यायालयाने देशमुखांना फटकारलं!
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीची कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होते. यावेळी सुनावणी दरम्यान, न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. या आधी देशमुखांच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. मात्र, विशेष न्यायालयाने त्यांना ईडीची कस्टडी दिली होती. त्यानंतर अखेर अनिल देशमुखांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अनिल देशमुख यांनी कोठडीत घरचं जेवण देण्यासाठी मागणी केली होती. ती फेटाळण्यात आली आहे. आधी तुरुंगातील जेवण घ्या, अशा शब्दात न्यायालयाने त्यांना फटकारलं. त्यामुळे घरच्या जेवणाबाबत करण्यात आलेला विनंती अर्ज फेटाळून लावला आहे.
29 नोव्हेंबर पर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. अनिल देशमुखांचे वय व त्यांना असलेले आजार लक्षात घेता घरचे जेवण मिळावे, अशी विनंती त्यांचे वकिल अनिकेत निकम यांनी केली होती. “अनिल देशमुख यांना पाठीचा त्रास असल्याने त्यांना जमीनवर झोपताना त्रास होत आहे. त्या़ंचे वय आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बेडची मागणी मान्य करावी” असा अर्ज त्यांचे वकिल इंद्रपाल सिंह यांनी केला आहे.
देशमुखांवर कारागृहात खासगी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार व्हावेत तसेच औषध पुरवण्याबाबत ही अर्ज करण्यात आला आहे. न्यायालयाने अनिल देशमुखांना वैद्यकीय उपचार, औषध आणि बेडची परवानगी दिली आहे. मात्र घरचे जेवण देण्याला न्यायालयाने मंजुरी दिलेली नाही.
Esakal