रामदास आठवले
sakal_logo

द्वारे

मिलिंद तांबे

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांचे जीवनचरित्र (Biography) आणि त्यांचा इतिहास (history) सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आयुष्य समर्पित केलेले पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare death) यांच्या निधनाने शंभरी पार केलेला जाणता साहित्यिक (Writer) शिवशाहीर हरपला आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा: सॅम डिसुझा मुंबई SIT समोर हजर, अन्…

दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होते.त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि इतिहास जगासमोर मांडण्यात आपल्या लेखणी आणि वाणीद्वारे स्वतःला वाहून घेतले.त्यांचे व्याख्यान ;वाणी; वक्तृत्व अमोघ होते.ते महान इतिहासकार इतिहास संशोधक होते.शिव चरित्रावर आधारित त्यांचे साहित्य होते.राजा शिवछत्रपती हे त्यांचे पुस्तक लोकप्रिय झाले. ते शिवचरित्रकार आणि जाणते साहित्यिक होते.

त्यांचे जाणता राजा हे महानाट्य लोकप्रिय ठरले. दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी माझे चांगले संबंध होते.अनेकदा त्यांना भेटण्याचा मला योग लाभला. दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी दिलेले योगदान मोठे असून त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन;साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची शोकभावना रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here