
5 तासांपूर्वी
मुंबई : परदेशात उच्चशिक्षण (higher education) घेऊ पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची (Indian student) पहिली पसंती अमेरिकेलाच (America) आहे. जगभरातून अमेरिकेत (America) उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 20 टक्के विद्यार्थी भारतीय आहेत. यावर्षीही पावणेदोन लाख भारतीय विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेले आहेत.
हेही वाचा: कंगना राणावत विरोधात पालघरमध्ये तक्रार
यावर्षी अमेरिकेत जगभरातील दोनशे शहरांमधून नऊ लाख 14 हजार विद्यार्थी उच्चशिक्षण घेण्यासाठी आले. त्यात एक लाख 67 हजार 582 भारतीय विद्यार्थी होते. कोविडकाळातही अमेरिकेत परदेशी विद्यार्थ्यांचे स्वागतच करण्यात आले. त्यासाठी सर्व काळजी घेऊन ऑनलाईन व हायब्रीड पद्धतीने शिक्षण देण्यास सुरुवात झाली.
अमेरिकेचे कौन्सुलर अफेअर खात्याचे मंत्री डॉन हेफलिन यांनी प्रसिद्ध केलेल्या ओपन डोअर अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात आम्ही भारतीय विद्यार्थ्यांसाठी 62 हजार स्टुडंट व्हिसा जारी केले. यापूर्वी कोणत्याही उन्हाळी हंगामात एवढे स्टुडंट व्हिसा दिले नव्हते, असेही त्यांनी दाखवून दिले.
याहीपुढे जास्तीतजास्त भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत उच्चशिक्षण घेता यावे म्हणून मोठ्या संख्येने स्टुडंट व्हिसा जारी केले जातील, असेही ते म्हणाले. यावर्षी उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत आलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचेही अहवालात म्हटले आहे. अमेरिकेत उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी एज्युकेशनयुएसए इंडिया अॅप डाऊनलोड करावे, असे अमेरिकी महावाणिज्य दूत कार्यालयामार्फत सांगण्यात आले आहे.
Esakal