सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
sakal_logo

द्वारे

संतोष शाळीग्राम

नवी दिल्ली : अमरावती दंगल प्रकरणी काँग्रेसने भाजपवर केले असले, तरी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपवर आरोप करणे टाळले आहे. ही दंगल महाराष्ट्रासाठी गंभीर बाब असली, तरी मी पूर्ण चौकशी झाल्याशिवाय कुणावरही आरोप करणार नाही, अशी भूमिका चव्हाण यांनी घेतली. अशोक चव्हाण यांनी आज‌ सायंकाळी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

देगलूर विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार जितेश अंतापूरकर यांची केंद्रीय नेत्यांशी उद्या भेट घडवणार आहोत. त्यासाठी दिल्लीत आल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचीही भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले. नांदेड ते हैदराबाद ग्रीन फिल्ड प्रोजेक्ट आणि रस्ता या संदर्भात चर्चा केली आहे, असे सांगताना औरंगाबाद-पुणे या रस्त्याबाबत चर्चा केली. मराठवाड्यातील बुलेट ट्रेन संदर्भात विनंती केली. ते या प्रकल्पांबाबत सकारात्मक आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा: बीड : शासकीय धान्याला फुटले पाय; पोत्यामागे तीन किलो कमी

विधान परिषदेच्या एक जागेसाठी प्रज्ञा सातव यांची उमेदवारी जाहीर केली आहे. ही जागा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढवत आहोत. त्यामुळे कोणत्याही स्थितीत जिंकणार यात शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवाब मलिक आणि भाजप वादावरून ते म्हणाले, “राजकारणाचा स्तर घसरू नये. व्यक्तीगत वैर असल्यासारखे कुणी वागू नये. पण कुणी आरोप केला, तर उत्तर द्यावे लागेल.

अमरावतीच्या दंगलीच्या घटना ही महाराष्ट्रासाठी गंभीर बाब आहे. या गोष्टी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करावी लागते. म्हणून कारवाई केली. या प्रकरणी मला कुणावरही आरोप करायचे नाही. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय मी यावर काहीही बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्री पदाचा कार्यभार कुणाकडे, याबाब विचारले असता, मुख्यमंत्री दोन तीन दिवसांत सेवेत रुजू होतील. या काळात त्यांनी पदाचा कार्यभार कुणाकडे देण्याचा प्रश्न नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: पुणे : पुरंदरे यांच्या निधनाबद्दल दुखवट्याचा ठराव एकमताने मंजूर

पंडित नेहरूंच्या जयंती दिनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सत्ताधारी नेते उपस्थित नाही, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. देशाचे पहिल्या पंतप्रधानांबाबत अशी घटना घडली नाही, पण आता ही नवी परंपरा या सरकारने सुरू केली आहे, अशी टीका त्यांनी केली.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here