
IND vs NZ : KL राहुलला प्रदुषणासंदर्भातील बाउन्सर; मिळालं हे उत्तर
१६ नोव्हेंबर २०२१
न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झालाय. संघातील काही खेळाडूंनी सोमवारी सराव सत्रातही भाग घेतल्याचे पाहायला मिळाले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 17 नोव्हेंबरपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना जयपूरच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी राजधानी दिल्लीप्रमाणे जयपूर शहरातही हवेचा दर्जा खराब झाला आहे.
त्यामुळेच सामन्यापूर्वी भारतीय टी-20 संघाचा उप- कर्णधार लोकेश राहुल याला जयपूर शहरातील वायू प्रदुषणाच्या मुद्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. सराव सत्राला सुरुवात करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांनी त्याला हा प्रश्न विचारला. यावर लोकेस ऱाहुल म्हणाला की, आम्ही आता बाहेर पडलोय. स्टेडियमवर येताना प्रदुषण मोजण्याचं यंत्र सोबत आणलेलं नाही. त्यामुळे प्रदुषणाचा स्तर नेमका किती याची माहिती नाही. आम्ही सर्वजण इथे क्रिकेट खेळायला आलोय. सामन्यात प्रदुषणाचा काही व्यत्यय येणार नाही, अशी आशाही त्याने यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा: “तिने फायटिंगचा नाद सोडून अॅक्टिंगवर लक्ष्य द्यावं”
भारतीय संघ नवा कर्णधार आणि नव्या प्रशिक्षकासह जयपूरला रवाना झाला. तीन दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करुन संघातील खेळाडूंनी सरावाला स्टेडियवर हजेरी लावली होती. कर्णधार रोहित शर्मा, संघातील इतर खेळाडूंसह द्रविडसोबत अन्य स्टाफ सदस्यही या सराव शिबिरात उपस्थितीत होते.
हेही वाचा: विमानतळावर हार्दिक पांड्याची 5 कोटींची घड्याळं जप्त
न्यूझीलंडचा टीम इंडियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-मालिका खेळणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर दोन्ही संघातील पहिला सामना खेळवण्यात येईल. दुसरा टी-20 सामना रांचीच्या मैदानात रंगणार आहे. तर तिसरा आणि अखेरचा सामना कोलकाताच्या मैदानात खेळवण्यात येईल. टी 20 मालिकेनंतर दोन्ही संघात दोन सामन्यान्यांची कसोटी मालिकाही रंगणार आहे.
Esakal